11 December 2017

News Flash

नंदुरबारमध्ये धरणात बुडून तिघांचा मृत्यू

तीन जणांचे प्राण वाचवण्यात यश

नंदुरबार | Updated: August 9, 2017 9:17 PM

प्रातिनिधिक छायाचित्र

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात धरणात बुडून तिघांचा मृत्यू झाला. दरा धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या सहा तरुणांपैकी तीन जणांचा बुडून मृत्यु झाल्याची घटना बुधवारी घडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदूरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील व्ही.के. शहा महाविद्यालयात शिक्षण घेणारे ६ महाविद्यालयीन तरुण उनपदेव या पर्यटनस्थळी गेले होते. या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर चारच्या सुमारास ते पोहण्यासाठी दरा धरणावर गेले. सर्वजण धरणात उतरले, पण पाण्याच्या अंदाज न आल्याने ते बुडायला लागले.

हा घटनेनंतर  स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना तीन जणांचे प्राण वाचवण्यात यश आले. मात्र त्यातील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तुषार आहिरराव, चेतन बेलदार आणि जयेश सोनवणे या तिघांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच म्हसावद पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनतर तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शहादा येथे पाठवण्यात आले.

 

First Published on August 9, 2017 8:56 pm

Web Title: three students drown in nandurbar dam