News Flash

देशात सर्वाधिक साडेतीन हजार स्टार्टअप महाराष्ट्रात

स्टार्टअप उद्योगात झालेल्या वैकल्पिक गुंतवणुकीतही महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे.

‘स्टार्टअप इंडिया’ योजनेंतर्गत गेल्या चार वर्षात देशभरात 19 हजार 351 स्टार्टअप उद्योगांची नोंदणी झाली असून सर्वाधिक 3 हजार 661 स्टार्टअप उद्योगांची नोंदणी एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. या योजनेंतर्गत देशातील राज्यांमध्ये स्टार्टअप उद्योगात झालेल्या वैकल्पिक गुंतवणुकीतही महाराष्ट्राने आघाडी घेत देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. राज्यात एकूण 68 स्टार्टअप मध्ये 440 कोटी 38 लाखांची वैकल्पिक गुंतवणूक झाली आहे.

केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्यावतीने 16 जानेवारी 2016 पासून देशभरात ‘स्टार्टअप इंडिया’ योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. एकूण 19 कृती आराखड्यानुसार सुरु असलेल्या या कार्यक्रमावर देखरेख ठेवणाऱ्या केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग व देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) 24 जून रोजी राज्यनिहाय स्टार्टअप उद्योगांची यादी जाहीर केली आहे. या यादीत देशातील 29 राज्ये आणि 7 केंद्र शासीत प्रदेशांची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून 3 हजार 661 स्टार्टअप उद्योगांसह महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. या यादीत महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक 2 हजार 847, दिल्ली 2 हजार 552, उत्तरप्रदेश 1 हजार 566 तर 1 हजार 80 स्टार्टअपसह तेलंगण पाचव्या स्थानावर आहे.

लघु उद्योग विकास बँकेने भांडवली बाजारावर देखरेख ठेवणाऱ्या ‘सेबी’ संस्थेकडे नोदंणीकृत संस्थांच्या माध्यमातून स्टार्टअप उद्योगांसाठी वैकल्पिक गुंतवणूक निधी उभारला आहे. या निधीच्या माध्यमातून देशभरात 13 राज्ये आणि दिल्लीत 247 स्टार्टअप उद्योगांत 1 हजार 625 कोटी 73 लाखांची वैकल्पिक गुंतवणूक केली आहे. या यादीत महाराष्ट्र 68 स्टार्टअपमधील 440 कोटी 38 लाखांच्या वैकल्पिक गुंतवणुकीस दुस-या स्थानावर आहे. तर 75 स्टार्टअप मधील 499 कोटी 85 लाखांच्या वैकल्पिक गुंतवणुकीस कर्नाटक पहिल्या स्थानावर आहे. स्टार्टअप इंडिया योजनेंतर्गत स्टार्टअप उद्योग उभारण्यासाठी ‘फंड ऑफ फंड फॉर स्टार्टअप’ (एफएफएस) नावाने 10 हजार कोटींचा निधी उभारला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 6:44 pm

Web Title: three thousand five hundred startup in maharashtra lok sabha piyush goyal jud 87
Next Stories
1 ‘मी महाराष्ट्राचीच’, प्रीतम मुंडेंच्या इंग्रजीतील प्रश्नाला स्मृती इराणींचं मराठीतून उत्तर
2 काँग्रेसची दिल्ली, तेलंगण प्रदेश समिती बरखास्त
3 जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवला
Just Now!
X