30 September 2020

News Flash

‘फेसबुक’च्या माध्यमातून दुर्गम क्षेत्रातील ४४ विद्यार्थ्यांना ‘स्वेटर्स’ मिळाले

या स्वेटर्स कुरियर व रेल्वेच्या माध्यमातून दात्यांनी पाठवल्या.

गोंदिया : सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे, त्यातल्या त्यात सोशल मीडिया बहुतेकांच्या जीवनातील अविभाज्य अंग बनले आहे. आजची युवा पिढी तर फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर तासन्तास घालवते. त्याबद्दल त्यांच्यावर टीका सुद्धा होते. पण याच फेसबुकच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील अतिशय दुर्गम म्हणून ओळख असलेल्या देवरी तालुक्यातील पालांदूर जमीनदारी या क्षेत्रातील ४४ गरजू विद्यार्थ्यांना ‘स्वेटर्स’ मिळाल्या आहेत.

‘फेसबुकवर ‘आम्ही मराठी शाळा वाचवायलाच पाहिजेत’ या समूहाद्वारे मराठी माध्यमाच्या शाळा वाचवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात तसेच गरजू विद्याथ्र्र्याना मदतसुद्धा केली जाते. याच समूहाचे सदस्य असलेले व जि.प. प्राथमिक शाळा टेकरी येथे जून महिन्यापासून सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले महेंद्र रहांगडाले यांनी या समूहामध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर्सची गरज असून कुणी मदत करण्यास तयार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊ न मुंबई, पुण्यातील अनेक मंडळींनी संपर्क साधला. टेकरी शाळेला स्वेटर्सची व्यवस्था झाल्यानंतर, पुन्हा इतर शाळेतील विद्यर्थ्यांना स्वेटर्स मिळाव्यात म्हणून महेंद्र रहांगडाले, सुरेंद्र गौतम, मोहन बिसेन यांनी अमोल साळवे, दौंड पुणे यांच्यासोबत संपर्क साधून रोपा व धोडरा या इतर दोन शाळांतील  विद्यार्थ्यांनासुद्धा स्वेटर्स मिळवून दिल्या.

टेकरी शाळेतील विद्यार्थ्यांना देवकांत बनकर व त्यांचे सहकाऱ्यांनी उत्तम दर्जाच्या स्वेटर्स प्रदान केल्या तसेच धोडरा व रोपा येथील विद्यार्थ्यांना दौंड, पुणे येथे रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेले अमोल साळवे व त्यांच्या जर्मनीमध्ये वास्तव्य असलेल्या भगिनी केसरकर यांनी स्वेटर्स दान केल्या. या स्वेटर्स कुरियर व रेल्वेच्या माध्यमातून दात्यांनी पाठवल्या. अशाप्रकारे समाज माध्यमाच्या विधायक वापरातून ४४ अतिदुर्गम क्षेत्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर्स प्राप्त झाल्या.

स्वेटर्स वाटपाचे कार्यक्रम तिन्ही शाळांचे शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्या उपस्थितीत २ डिसेंबरला  करण्यात आले. स्वेटर्स मिळाल्याने विद्यार्थ्यांना आनंद तर झालाच मात्र पालकांनीसुद्धा दात्यांचे आभार मानले. स्वेटर प्रदान केलेल्या दात्यांचे पालांदूर केंद्राचे केंद्रप्रमुख लंजे, धोडरा शाळेचे शिक्षक व शिक्षक सहकार संघटना गोंदियाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गौतम, टेकरीचे मुख्याध्यापक मोहन बिसेन, रोपाचे मुख्याध्यापक महानू हुंडरा, सहाय्यक शिक्षक चौधरी, धोडराचे मुख्याध्यापक वीरेंद्र खोब्रागडे तसेच पालांदूरचे उपसरपंच नुरचंद नाईक यांनी आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 3:21 am

Web Title: through facebook 44 students from remote areas got sweaters zws 70
Next Stories
1 कराड-चिपळूण रस्त्यावर एसटी बस-मोटारकार अपघातात महिला ठार
2 पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता
3 युवतीवर बलात्कार करून जिवे मारण्याचा प्रयत्न
Just Now!
X