19 September 2020

News Flash

पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळच्या सलामा क्षेत्रात आढळला वाघाचा मृतदेह

वाघाचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज

पेंच व्याघ्र प्रकल्पातील पूर्व पेंच वनक्षेत्रातील सलामा वनक्षेत्रात शनिवारी दुपारच्या सुमारास वाघाचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली. गस्तीदरम्यान ही घटना उघडकीस आली. वनरक्षकांनी ही माहिती वरिष्ठांना देताच पेंच व्याघ्रप्रकल्पाचा चमू घटनास्थळी पोहचला. घटनेचा पंचनामा सुरू असून शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळेल.

प्रथमदर्शनी अपघाती मृत्यूची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या व्याघ्रप्रकल्पालगत राष्ट्रीय महामार्ग ४४ असल्याने वाघ, बिबट्यासह वन्यप्राणी मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडतात. मात्र टाळेबंदीच्या काळात वाहतूक मंदावली असतानाही अपघाती मृत्यूमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2020 7:51 pm

Web Title: tiger death near pench reserve forest may accidental death scj 81
Next Stories
1 आरोग्य कर्मींच्या सुरक्षिततेसाठी स्वाब कलेक्शन बूथ
2 प्रशासनाच्या आश्वासनानंतर मालेगावात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे
3 मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट, घरोघर वितरणावर मात्र बंदी 
Just Now!
X