ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातंर्गत येत असलेल्या मोहर्ली वनपरिक्षेत्रातील सितारापेठ बिट कक्ष क्रमांक ९५६ मध्ये एका पूर्ण वाढ झालेल्या वाघिणीचा मृतदेह आज आढळून आल्याने वनविभागामध्ये खळबळ उडाली आहे. वाघिणीचा मृतदेह सितारामपेठ व कोडेंगाव परिसरातून वनविभागाने ताब्यात घेतला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी या वाघिणीचे शवविच्छेदन केले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच वाघिणी मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला आहे हे स्पष्ट होणार आहे. अशी माहिती ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांनी दिली..
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 10, 2020 5:25 pm