10 July 2020

News Flash

टिकटॉकवरील खेळ खेळताना सांगलीत विद्यार्थी जखमी

मुलाचा हात मोडला असून त्याला प्लॅस्टर करण्यात आले आहे.

टिकटॉकवरील आव्हानात्मक खेळाचे प्रात्यक्षिक करीत असताना जखमी झालेला पृथ्वीराज देसाई.

सांगली : टिकटॉकवरील खेळ खेळताना आठवीतील विद्यार्थी जखमी झाल्याची घटना सांगलीत घडली असून या प्रकारामुळे पालकवर्गामध्ये खळबळ उडाली आहे. एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आवारामध्ये हा प्रकार घडला असून यामध्ये मुलाच्या हाताला गंभीर इजा झाली असून त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

किशोरवयीन मुलामध्ये लोकप्रिय असलेल्या टिकटॉक खेळाचे वेड शाळकरी मुलामध्येही पसरले असून याची अनुभूती सांगलीत आली. एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आवारात काही मुले टिकटॉकवर लोकप्रिय असलेल्या ‘स्कल ब्रेकर चॅलेज’ या नावाच्या खेळाचे प्रात्यक्षिक करीत असताना पृथ्वीराज प्रशांत देसाई हा आठवी इयत्तेत शिकत असलेला विद्यार्थी जखमी झाला. त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये मुलाचा हात मोडला असून त्याला प्लॅस्टर करण्यात आले आहे. तर त्याच्या पायाला आणि डोक्यालाही दुखापत झाली आहे.

या प्रकाराने पालकवर्गासह शिक्षक वर्गत भीती निर्माण झाले आहे. या घटनेतून  टिकटॉकवरील जीवघेण्या खेळांचे अनुकरण शालेय स्तरावर सुरू असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार पालकांना कळाल्यानंतर ते हादरून गेले. त्यांनी याबाबत शाळेकडे तक्रार केली आहे.

तीन मुलांनी किंवा मुलींनी सामुदायिक उडी मारल्यानंतर दोन्ही बाजूला उभे राहिलेल्यांनी मधल्या मुलाच्या पायावर मारून त्याला पाडण्याचा एक व्हीडिओ टिकटॉकवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अपघातग्रस्त मुलाला घेऊन शाळेतील दोन मुलांनी असा प्रकार करण्याचा प्रयत्न केला. ‘टिकटॉक’वरील या व्हिडिओ बाबत जखमी विद्यार्थ्यांस काही कल्पना नव्हती, असे जखमी मुलाच्या पालकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे हा गेम खेळण्यास तो तयार झाला आणि त्यात त्याला ही दुखापत झाली. मुले असे व्हिडिओ पाहणार नाहीत याची पालकवर्गाने काळजी घेणे तसेच याबाबत शिक्षकांनी प्रबोधन करण्याची गरज असल्याचे जखमी मुलाचे वडील प्रशांत देसाई यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2020 2:02 am

Web Title: tiktok application play student injury in sangli akp 94
Next Stories
1 बारावी परीक्षेचा पेपर देण्यासाठी जाताना अपघात; विद्यार्थ्यांचा मृत्यू
2 सोलापूर बलात्कारातील आरोपींच्या संख्येचा घोळ
3 एका उद्योगाला नवसंजीवनी
Just Now!
X