22 September 2019

News Flash

‘टिकटॉक’फेम आकाशची रेल्वेखाली आत्महत्या

आकाशने आत्महत्या केल्याचा प्रकार समजताच त्याच्या कुटुंबीयांसह मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्रतीकात्मक छायाचित्र

सोलापूर : ‘टिकटॉक’ या समाज माध्यमावर प्रसिध्द असणाऱ्या सोलापुरातील आकाश जाधव (वय २७) या तरूण कलावंताने रेल्वेखाली आत्महत्येचा मार्ग पत्करल्याची घटना घडली. रविवारी रात्री हा प्रकार घडला. आकाश जाधव हा ‘टिकटॉक’ समाजमाध्यमावर प्रसिध्द होता. त्याने वेगवेगळ्या विषयांवर चित्रफिती तयार केल्या होत्या. त्याला समाज माध्यमावर मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळायचा. परंतु मानसिक ताण-तणावातून आकाश जाधव (रा. पटवर्धन चाळ, रामवाडी, सोलापूर) याने गुंगी आणणाऱ्या औषध गोळ्यांचे सेवन केले व नंतर विषदेखील प्राशन केले.

शेवटी तो घराजवळच रेल्वेरूळावर जाऊन झोपला. हा प्रकार परिसरातील काही तरुणांनी पाहिला आणि त्याला हटकत आरडाओरड केली. तेव्हा आकाश तेथून उठून पुन्हा काही अंतरावर पुढे जाऊन रेल्वेरूळावर झोपला. अखेर एका मालगाडीखाली सापडून त्याचा मृत्यू झाला. आकाशने आत्महत्या केल्याचा प्रकार समजताच त्याच्या कुटुंबीयांसह मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. आकाश विवाहित होता.

First Published on August 20, 2019 1:43 am

Web Title: tiktok fem akash jadhav commits suicide loksatta