News Flash

कोल्हापूरची महालक्ष्मी, दख्खनचा राजा जोतीबाच्या दर्शनाची वेळ वाढवली

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दिली माहिती; जाणून घ्या कधी घेता येणार दर्शन

संग्रहीत

गुढीपाडव्याला मंदिरे खुली झाल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने करवीर निवासिनी महालक्ष्मी, दख्खनचा राजा जोतीबासह तीन हजारावर मंदिरातील दर्शनाची वेळ वाढविण्यात आल्याचे सोमवारी सांगितले.

आतापर्यंत सकाळी ९ ते १२ या वेळेत मिळणारे दर्शन यापुढे ७ ते १२ या वेळेत घेता येईल. तर सायंकाळी ४ ते ७ या वेळेत सुद्धा दर्शन मिळणार आहे. एकाच वेळी भाविकांची गर्दी होऊ नये. दर्शन अधिक सुलभ व्हावे यासाठी दर्शनाची वेळ वाढवली असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.

७० हजार भाविक देवीचरणी –
राज्यशासनाच्या निर्णयानुसार मंदिरांचे दरवाजे सोमवारपासून उघडण्यात आले. ८ महिन्यांनंतर दर्शन लाभ होत असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. महालक्ष्मी मंदिरात एका आठवड्यात सुमारे ७० हजार भाविकांनी दर्शन घेतले असल्याची माहिती देवस्थान समितीने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 8:24 pm

Web Title: time extended for pray at mahalaxmi and jyotiba temple msr 87
Next Stories
1 महाराष्ट्रात ४ हजारांपेक्षा जास्त नवे करोना रुग्ण, ३० रुग्णांचा मृत्यू
2 “….तर महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउनची गरज भासणार नाही”
3 महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यात १ डिसेंबरपासून सुरू होणार शाळा
Just Now!
X