28 February 2021

News Flash

विठ्ठलाच्या दर्शनावरुन वारकरी परिषदेला शरद पवार यांचे प्रत्युत्तर

वारकरी परिषदेचे वक्ते महाराज यांनी एक पत्रक जारी केलं होत. यामध्ये त्यांनी शरद पवार हे नेहमीच हिंदू धर्माला विरोध करतात असा आरोप केला होता.

(संग्रहित छायाचित्र)

विठ्ठलाच्या, माऊलींच्या आणि तुकोबांच्या दर्शनाला जायचं असेल तर कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. अन त्यामुळे कोणी सांगितलं की, तुम्हाला परवानगी नाही. तर त्यांना वारकरी संप्रदायाचा विचारच समजला नाही. सच्चा वारकरी अशी भूमिका कधी घेणार नाही. त्यामुळे मी फारसं लक्ष देत नाही असा खोचक टोला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता राष्ट्रीय वारकरी परिषदेला लगावला आहे. त्यामुळे अशा लहान सहान गोष्टी होत असतात. दुर्लक्ष करायचे असते असे पवार म्हणाले.

वारकरी परिषदेचे वक्ते महाराज यांनी एक पत्रक जारी केलं होत. यामध्ये त्यांनी शरद पवार हे नेहमीच हिंदू धर्माला विरोध करतात असा आरोप केला. ‘पवार हे हिंदू धर्माला विरोध करतात. ते रामायणाला विरोध करतात. पवार नास्तिक मंडळींना पाठिंबा देतात. त्यामुळेच त्यांना यापुढे वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलवण्यात येऊ नये; अशा आशयाचं पत्रक महाराजांनी जारी केलं होतं, यावर शरद पवार यांनी आज भाष्य केले.

शरद पवार म्हणाले की, विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला, माऊलींच्या दर्शनाला आळंदीला तर तुकोबांच्या दर्शनाला देहूला जायचं असेल तर कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. अन त्यामुळे कोणी सांगितलं की, तुम्हाला परवानगी नाही. त्यांना वारकरी संप्रदायाचा विचारच समजला नाही असा खोचक टोला यावेळी शरद पावर यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेला नाव न घेता लगावला आहे.

त्यामुळे सच्चा वारकरी अशी भूमिका कधी घेणार नाही. मी फारसा लक्ष देत नाही. लहान सहान गोष्टी होतात. त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे असते असे पवार म्हणाले. आपणाला जो रस्ता पसंत आहे त्या रस्त्यावर प्रामाणिकपणाने जायचं असत. तिथे बांधिलकी ठेवायची असते. त्यांच्यामध्ये तडजोड करायची नसते. याच भावनेने मी आज या ठिकाणी आलो आहे असं शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

आज मी आळंदीमध्ये आलो आहे, मनामध्ये कुठला हेतू ठेऊन आलो नाही. पंढरपूर , देहू, आळंदीला, तुळजापूर आणि शेगावला जात असतो. माझा या सर्व ठिकाणी जाण्याचा हेतू त्याच प्रदर्शन करण्याचा नसतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 1:43 pm

Web Title: to go pandharpur dehu alandi no need anyone permission sharad pawar kjp 91 dmp 82
Next Stories
1 काळाचा घाला, ट्रॅक्टर नाल्यात उलटून आठ ऊसतोड कामगारांचा मृत्यू
2 VIDEO: रायबा किल्लेदार असलेल्या पारगडची पंतप्रधान मोदींकडून दखल
3 हिंगणघाट पीडितेचा सर्व खर्च उचलण्याची तयारी, उद्योजक आनंद महिंद्रांच भावनिक ट्विट
Just Now!
X