स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे तिकिटांसाठी ज्या श्रमिक ट्रेन सोडण्यात येत आहेत त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी CMRF अर्थात मुख्यमंत्री सहायता निधीमधून ५४.७५ कोटींचा निधी मंजूर केला आहे.ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

लॉकडाउन ३ च्या काळात स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात, त्यांच्या गावी पोहचता यावं यासाठी विशेष श्रमिक ट्रेन्स सोडण्यात येत आहेत. महाराष्ट्रातल्या स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे तिकिटांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून ५४ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ही वाढते आहे. अशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १७ मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे लॉकडाउन ४ ही असणार आहे. मात्र याबाबत अजून स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या नाहीत. सुरुवातीला लॉकडाउनचे नियम कठोर होते. मात्र लॉकडाउन ३ च्या काळात काही अटी शर्थींवर प्रवासाला संमती देण्यात आली आहे. अशात आता महाराष्ट्रातून सुटणाऱ्या श्रमिक ट्रेनच्या तिकिटांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी CMRF मधून ५४ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर केला आहे.