News Flash

दिलासादायक : राज्यात आज करोनाबाधितांपेक्षा दुपटीहून जास्त रूग्ण करोनामुक्त

दिवसभरात ११ हजार ७७ रूग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.

corona maharashtra
राज्यात आज रोजी एकूण ७४ हजार ३१८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.(प्रतिकात्मक छायाचित्र)

राज्यात आज दिवसभरात दुपटीहून अधिक रूग्ण करोनातून बरे झाल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. राज्याती करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत आहे. मात्र तरी देखील दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या करोनामुक्त झालेल्यांच्या तुलनेत कधी जास्त तरी कधी कमी आढळून येत आहे. मात्र आज राज्या आढळलेल्या करोनाबाधितां पेक्षा करोनातून बरे झालेल्यांची संख्या ही दुपटीहून अधिक आढळल्याचे दिसून आले आहे. आज दिवसभरारत राज्यात ११ हजार ७७ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ४ हजार ८७७ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय राज्यात आज ५३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६०,४६,१०६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.४३ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६९,९५,१२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,६९,७९९ (१३.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,०१,७५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,५१८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ८८,७२९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2021 10:18 pm

Web Title: today 11 thousand 77 patients were cured from corona in the state msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 VIDEO : तळीयेत ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं; ऐका घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या अक्षदाकडून…
2 पूरग्रस्तांना दहा हजारांची रोख मदत, पाच हजारांचं धान्य; ठाकरे सरकारचा निर्णय!
3 Maharashtra FYJC CET 2021: अकरावीच्या सीईटीसाठी नोंदणीस मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार फॉर्म
Just Now!
X