उद्यापासून (शनिवार) सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेत अध्ययनात गती कमी असणाऱ्या स्वमग्न विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांचा पेपर देताना कॅलक्युलेटर वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच अध्ययन क्षमता तपासण्यासाठी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल अचिव्हमेंट सव्र्हेसाठी जिल्ह्य़ातील ३३ शाळांमध्ये विशेष परीक्षाही घेतली जाणार आहे.
उलटी चित्रे दिसणे, उलटे आकडे दिसणे किंवा गणित सोडवताना अडचणी येणाऱ्या ऑटिस्टिक आजाराने ग्रस्त अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना कॅलक्युलेटर वापरता येणार आहे. गणितासह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांसाठीही ही परवानही देण्यात आली आहे. फक्त विद्यार्थ्यांना आणलेला कॅलक्युलेटर साध्या स्वरुपाचा असावा. इतर इलेक्ट्रॉनिक स्वरुपात कॅलक्युलेटर वापरता येणार नाही. ज्या विद्यार्थ्यांने परीक्षेच्या वेळी तसा आजार असल्याचे कळविले आहे, त्यांनाच ही परवानगी असल्याचे कळविण्यात आले आहे.
गुणवत्तेसाठी सर्वेक्षण
शालेय स्तरावर देण्यात येणाऱ्या सुविधांचा गुणवत्तेवर काय परिणाम होतो, याची तपासणी करण्यासाठी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची सोमवारी (दि. २३) सकाळी ११ वाजता विशेष परीक्षा घेतली जाणार आहे. ३३ शाळांतील ४५ विद्यार्थ्यांची इंग्रजी, गणित, शास्त्र, समाजशास्त्र, मराठी या विषयाची परीक्षा होणार असून ती दीड तासांची असेल.
बारावीची परीक्षा आजपासून;
कॉपीमुक्तीसाठी भरारी पथके
वार्ताहर, लातूर
बारावीच्या परीक्षेला उद्या (शनिवारी) सुरुवात होत असून, जिल्हय़ातील ७५ केंद्रांवर दक्षता पथके तनात करण्यात आली आहेत.
लातूर जिल्हय़ात ७५ केंद्रांवर ३१ हजार १४३, नांदेडमधील ६७ केंद्रांवर २७ हजार ८१७, तर उस्मानाबाद जिल्हय़ातील ३७ केंद्रांवर १५ हजार ३६१ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. लातूर जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष पांडुरंग पोले यांनी सर्व केंद्रांवर रोटेशन पद्धतीने बठे पथक ठेवण्याची यंत्रणा कार्यान्वित केली. परीक्षेतील गरप्रकार कायमचे थांबवण्यासाठी जिल्हा दक्षता समिती व विभागीय मंडळ यांच्या वतीने कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. बठय़ा पथकात विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता दर्जाच्या अभियंत्यांचाही समावेश आहे. दक्षता समितीचे सचिव माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांच्यासह संस्थेतील महिला अधिव्याख्याताच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र महिला पथकही तयार करण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2015 1:56 am