News Flash

शहीद सुमेध गवई यांना अखेरचा सलाम; मूळगावी लष्करी इतमामात झाले अंत्यसंस्कार

काश्मीरमधील हल्ल्यात काल आले होते वीरमरण

शहीद सुमेध गवई यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात रविवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत शहीद झालेले अकोल्याचे सुपुत्र सुमेध वामन गवई यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. लष्करी इतमामात त्यांच्यावर मूळ गावी लोणाग्रा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. दरम्यान, गवई यांच्या कुटुंबियांसह अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

आज सकाळी हवाई दलाच्या विशेष विमानाने शहीद सुमेध गवई यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी लोणाग्रा येथे आणण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनाला सारा गाव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ गोळा झाले होते.

जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील सीमावर्ती गावात दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्याच्यावतीने शोध मोहीम राबवण्यात येत होती. यावेळी झालेल्या दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली. त्याचवेळी दहशतवाद्यांनी अचानक जवानांवर हल्ला केला. त्यांना भारतीय दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. पण दहशतवाद्यांनी अंदाधुंदपणे केलेल्या गोळीबारात अकोल्याच्या सुमेध गवई यांच्यासह तामिळनाडू येथिल जवान इलियाराजा पी. यांना वीरमरण आले होते. दरम्यान, चकमकीत तीन दहशतवादीही ठार झाले होते.

सुमेध गवई हे चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते. लोणाग्रा येथे त्यांचे आई-वडील, बहीण राहतात. त्यांचा लहान भाऊही लष्करात आहे. एक ऑगस्ट रोजीच त्यांचा वाढदिवस होता. लवकरच ते सुटीवर गावी येणार होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 4:20 pm

Web Title: today last rites ceremony of sepoy sumedh waman gowai at his village lonagra
Next Stories
1 राज्य सरकारमध्ये अनागोंदी कारभार
2 अबुजमाड जंगलातील नक्षलवाद्यांचे शिबीर उद्ध्वस्त
3 ..तर मुख्यमंत्र्यांना दिवाळी साजरी  करू देणार नाही – राजू शेट्टी