राज्यात आज ४ हजार ९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासात १० हजार २२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत १५ लाख २४ हजार ३०४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात १ लाख १८ हजार ७७७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९०. ३१ टक्के इतका झाला आहे.

राज्यात करोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश आरोग्य यंत्रणांना येऊ लागलं आहे. मागील २४ तासांमध्ये १० हजार २२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत १५ लाख २४ हजार ३०४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९०.३१ टक्क्यांवर पोहचला आहे. दिवाळी आधी करोना संसर्गाचा वेग मंदावला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९० लाख ६५ हजार १६८ चाचण्यांपैकी १६ लाख ८७ हजार ७८४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख ३३ हजार ७८० व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर १२ हजार १९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.