News Flash

Coronavirus – राज्यात दिवसभरात ४ हजार ९२ करोनाबाधित रुग्णांची वाढ

१ हजार ३५५ जण करोनातून बरे झाले

संग्रहीत

राज्यातील करोना संसर्ग पुन्हा काहीसा वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून दररोज करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात ४ हजार ९२ करोनाबाधित रुग्ण वाढले. तर, १ हजार ३५५ जण करोनातून बरे झाले.

राज्यात आतापर्यंत १९ लाख ७५ हजार ६०३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९५.७ टक्के झाले आहे. तर, राज्यात एकूण ३५ हजार ९६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

करोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातल्यानंतर जगभरात साथरोग आजारावरील संशोधनाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. भारतात करोनाचे सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद महाराष्ट्रात असून या पार्श्वभूमीवर पुणे औंध येथे ६०० कोटी रुपये खर्चून सुसज्ज साथरोग रुग्णालय उभारण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. आगामी अर्थसंकल्पात या औंध साथरोग रुग्णालयाची घोषणा केली जाईल, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

राज्यात औंध येथे ६०० कोटी रुपये खर्चून अद्ययावत साथरोग रुग्णालय!

महाराष्ट्रात करोनाचे आजपर्यंत २० लाख ६० हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले, तर ५१ हजाराहून अधिक रुग्णांचे मृत्यू झाले. देशातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रातील रुग्ण व मृत्यूंचे प्रमाण कितीतरी जास्त आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 10:02 pm

Web Title: today newly 4092 patients have been tested as positive in the state msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 राज्यात औंध येथे ६०० कोटी रुपये खर्चून अद्ययावत साथरोग रुग्णालय!
2 …प्रत्येक चाकात अनेक छिद्रे; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका
3 शिवजयंती साजरी झालीच पाहिजे पण…. – उदयनराजे
Just Now!
X