News Flash

Corona Update : महाराष्ट्रात नव्या करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली! मृतांचा आकडाही ३९३वर!

राज्यातील नव्या करोनाबाधितांची संख्या वाढल्याचं आजच्या आकडेवारीवरून दिसून आलं असून मृतांचा आकडा देखील ३९३ इतका नोंदवण्यात आला आहे.

राज्यात आज रोजी एकूण १,२१,८५९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.(संग्रहीत छायाचित्र)

करोनाची रुग्णसंख्या कमी झालेली असताना राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये पहिल्यांदाच राज्यात रुग्णसंख्या वाढल्याचं दिसून आलं आहे. गुरुवारी आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात १२ हजार २०७ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. हा आकडा गेल्या काही दिवसांमध्ये १० हजारांच्या घरात आला होता. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५८ लाख ७६ हजार ०८७ इतकी झाली आहे. यापैकी १ लाख ६० हजार ६९३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक सुरू करून ५ दिवस उलटले असून आज नव्या करोनाबाधितांच्या संख्येसोबतच मृतांचा आकडा देखील वाढला आहे.

 

राज्यात आज एकीकडे नवे करोनाबाधित वाढले असले, तरी दुसरीकडे ११ हजार ४४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा आता ५६ लाख ८ हजार ७५३ इतका झाला आहे. त्यामुळे अजूनही राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या वरच असून तो ९५.४५ इतका नोंदवण्यात आला आहे.

वीज कर्मचाऱ्यांची सामाजिक बांधिलकी! पगारातून १ दिवसाचा निधी सीएम केअर फंडमध्ये जमा!

राज्याचा मृत्यूदर १.७७ टक्के!

दरम्यान, राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या वर असताना आज राज्यात मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. बुधवारी राज्यात २६१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. आज हा आकडा वाढून ३९३ इतका झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर १.७७ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत राज्यात करोनामुळे १ लाख ३ हजार ७४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

मुंबईत दिवसभरात ६६० रुग्णांची नोंद

मुंबईत आज दिवसभरात ६६० नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत नवे करोनाबाधित सापडण्याचं प्रमाण कमी होताना दिसत आहे. त्याचवेळी दुसरीकडे आज दिवसभरात ७६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आजपर्यंत मुंबईत एकूण ६ लाख ८१ हजार २८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, आज दिवसभरात २२ रुग्णांचा करोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार १२२ इतका झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 8:53 pm

Web Title: todays corona cases in maharashtra patients increased with death toll reaching to 400 pmw 88
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज; अजित पवारांच्या घोषणेवर शिक्कामोर्तब
2 “हमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा”, राजू शेट्टींचं खुलं आव्हान!
3 वीज कर्मचाऱ्यांची सामाजिक बांधिलकी! पगारातून १ दिवसाचा निधी सीएम केअर फंडमध्ये जमा!
Just Now!
X