राज्यातील करोनाबाधितांचे बरे होण्याचे आजचे प्रमाण ६९.८ टक्के नोंदवले गेले असून दिवसभरात ११,५४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर २२,५४३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर ४१६ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने मृत्यू दर २.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

दिवसभरात आढळलेल्या २२,५४३ रुग्णांमुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १०,६०,३०८वर पोहोचली आहे. तसेच आज ११,५४९ रुग्ण बरे झाल्याने आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७,४०,०६१ झाली आहे. त्याचबरोबर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५२,५३,६७६ नमुन्यांपैकी १०,६०,३०८ (२०.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

दरम्यान, सध्या राज्यात १६,८३,७७० व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ३७,२९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. तसेच राज्यात सध्या २,९०,४३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.