मराठा आरक्षण विधेयक आज विधिमंडळात


मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून १६ टक्के आरक्षणाची तरतूद करणारे विधेयक राज्य विधिमंडळात गुरुवारी सादर होणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील कृती अहवालही राज्य सरकार सादर करणार आहे. सविस्तर वाचा…

‘जलयुक्त’ नव्हे, ‘झोलयुक्त’ शिवार


जलयुक्त शिवार ही ‘झोलयुक्त शिवार’ योजना झाली आहे. आठ हजार कोटी रुपयांच्या कामांपैकी किमान ७० टक्के कामांत सुमारे ४८०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. मंत्री कार्यालयात पाच टक्के तर अधिकाऱ्यांना दोन टक्के रक्कम दिल्याशिवाय कामे मंजूर होत नाहीत, असा खळबळजनक आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी केला.सविस्तर वाचा…

दिल्लीत धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, तिघे अटकेत


रोहिणी येथील नरेला परिसरात मंगळवारी रात्री उशिरा धावत्या कारमध्ये एका १२ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून रवी कुमार, मोहित आणि विनोद अशी त्यांची नावे आहेत. सविस्तर वाचा…

होय, माझं आणि मितालीचं पटत नाही, तिला सांभाळणं कठीण! – रमेश पोवार


मितालीच्या आरोपांनंतर प्रशिक्षक रमेश पोवार यांनी आपली बाजू बीसीसीआयसमोर मांडली आहे. पोवार यांनी आज बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी आणि मुख्य व्यवस्थापक साबा करीम यांनी मुंबईतल्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी बोलत असताना रमेश पोवार यांनी मितालीशी आपलं पटत नसल्याचं मान्य केलं आहे. सविस्तर वाचा…

‘दीप-वीर’चं मुंबईत शाही रिसेप्शन, पाहा फोटो


गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चा रंगलीये ती म्हणजे दीपिका- रणवीर या जोडप्याची. लग्नानंतर दोघांनी आज मुंबईत दुसऱ्या रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं आहे. या रिसेप्शनपार्टीत दोन्ही कुटुंबाचे जवळचे नातलग, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि अन्य क्षेत्रातील निवडक मंडळी उपस्थित आहे.सविस्तर वाचा…