News Flash

चिमुकलीला २०० देशांच्या राष्ट्रध्वजाची ओळख

सोबतच त्या देशांच्या राजधानींची नावे सुद्धा तिला माहिती आहे.

वैदिशा शेरेकर

चंद्रपूर/अकोला : मूळची अकोला येथील रहिवासी वैदिशा या अडीच वर्षीय चिमुकलीला तब्बल २०० पेक्षा जास्त देशांच्या राष्ट्रध्वजाची ओळख आहे. सोबतच त्या देशांच्या राजधानींची नावे सुद्धा तिला माहिती आहे. वैदिशाच्या या अलौकिक कामगिरीची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये घेण्यात आल्याची माहिती तिचे वडील वैभव शेरेकर यांनी दिली.

अकोल्यातील मोठी उमरी परिसरातील रहिवासी व सध्या चंद्रपूर येथील बँक ऑफ इंडियाच्या पद्मपूर शाखेमध्ये कार्यरत अधिकारी वैभव शेरेकर व दीपाली शेरेकर यांची कन्या वैदिशा या अडीच वर्षांच्या चिमुकलीने असाधारण बुद्धिमत्तेचा परिचय दिला. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’नंतर आता ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये तिने स्थान पटकावले. वैदिशा दीड वर्षांची असताना तिच्या वडिलांनी फळे, फुले, पक्षी, प्राणी व भाज्यांचा फलक आणून त्याची ओळख करून दिली. वैदिशाने ते सर्व एका दिवसात पाठ केले.

तिला विचारले असता ती अगदी अचूक ओळखत होती. वैदिशा अडीच वर्षांची झाल्यावर तिच्यासाठी सर्व देशांच्या राजधानी व त्या देशांचे राष्ट्रध्वज असलेले फलक आणून दिले. त्यावरून ती शिकत असताना १५ ते २० दिवसांत  २०० पेक्षा अधिक देशांच्या राजधानी तसेच त्यांचे राष्ट्रध्वज वैदिशा अचूकपणे सांगते. वैदिशाची ही कामगिरी लक्षात घेऊन तिचे नाव ‘इंटरनॅशनल बुक रेकॉर्ड’मध्ये नोंदवण्यात आल्याचे वैभव शेरेकर यांनी सांगितले. वैदिशाच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 12:02 am

Web Title: toddler vaidisha identifying 200 countries flag names zws 70
Next Stories
1 एम.एस. रेड्डीला दोन दिवसांची पोलीस कोठडी
2 महिलेशी असभ्य वर्तन : फिनले मिलच्या सहायक व्यवस्थापकाला अटक
3 मध्यवस्तीत असलेले कोविड केंद्र शहराबाहेर हलवण्याची मागणी
Just Now!
X