X
X

पुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार

READ IN APP

२६ तारखेपर्यंत जर मुख्यमंत्र्यांनी निर्णय न घेतल्यास आम्ही भविष्यात आणखी तीव्र लढा देऊ.

सकाळी नऊ वाजाता पुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात झाली आहे. दहा दिवसांमध्ये विधान भवनावर ही संवाद यात्रा धडकणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून मराठा संवाद यात्रा निघणार आहे. राज्यभरात आजपासून सुरू होणाऱ्या या यात्रा २६ नोव्हेंबर रोजी मुंबईतमध्ये विधान भवनावर धडकणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने या संवाद यात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाची अधिकृत घोषणा आणि इतर विविध प्रकारच्या मागण्या अद्यापही पूर्ण केल्या नसल्यानं मराठा समाजात जनजागृती करण्यासाठी या यात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.

राज्यात मागील दोन वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे. या मागणीसाठी मोर्चे काढण्यात आले असून राज्य सरकारने यासाठी एक समिती नियुक्त केली होती. त्या समितीने शासनाला आज अहवाल सादर केला आहे. तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ३० नोव्हेंबर पर्यंत थांबा असे सांगत आहेत. आता आमचा मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास राहीला नसून त्यांनी 25 तारखेपर्यंत निर्णय घ्यावा अशी मागणी गुरूवारी शांताराम कुंजीर यांनी पुण्यात केली होती. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, २६ तारखेपर्यंत जर मुख्यमंत्र्यांनी निर्णय न घेतल्यास आम्ही भविष्यात आणखी तीव्र लढा देऊ.

23
X