09 March 2021

News Flash

‘ई-पास’ घेऊन येणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी

बहुसंख्य भाविक हे पुणे -बेंगळुरू महामार्गाचा वापर करतात.

संग्रहित छायाचित्र

वाई : दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातील पाच जिल्ह्यंत ‘ई-पास’ घेऊन येणाऱ्या गणेशभक्तांना वाटेतील सर्व नाक्यांवर टोल माफ करण्यात आला आहे. तशी सूचना टोलनाक्यांवर दिली असून या भाविकांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचेही आदेश देण्यात आल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, तसेच उपनगरातून मोठय़ा प्रमाणात भाविक सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यंत जातात. यातील बहुसंख्य भाविक हे पुणे -बेंगळुरू महामार्गाचा वापर करतात. या मार्गावर तसेच याला जोडणाऱ्या अन्य मुख्य मार्गावरही जागोजागी टोलनाके आहेत. या काळात गावाकडे धावणारी भाविकांच्या मोठय़ा संख्येमुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. यामध्ये टोलनाक्यांची भर पडू नये यासाठी या सर्व नाक्यांवर गणेशभक्तांना टोलमाफी देण्यात आली आहे. तशी सूचना टोलनाक्यांवर दिली असून या भाविकांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचेही आदेश देण्यात आल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

महामार्ग दुरुस्तीची सूचना

पुणे –बेंगळुरू महामार्गावरील खेड-शिवापूर ते सारोळा या दरम्यानच्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची सूचना महामार्ग प्राधिकरणाऱ्या अधिकाऱ्यांना केली आहे. गणेशभक्तांच्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून टोलनाक्यावर गणेशभक्तांसाठी दोन मार्गिका मोकळ्या सोडाव्यात, नव्या मार्गिका वाढवण्याचा प्रयत्न करावा, टोलनाक्याच्या दोन्ही बाजूला एक किलोमीटर परिसरात तात्पुरते सुरक्षा कठडे लावावेत, सातारा जिल्ह्यतून कराड, कोयना, पाटण, चिपळूणमार्गेही काही गणेशभक्त कोकणात जाणार आहेत. त्यांच्यासाठी कुंभार्ली घाटात दोन तपासणी नाकी सुरू करावीत आदी सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या आहेत, अशी माहितीही देसाई यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 1:02 am

Web Title: toll exemption for ganesh devotees who having e pass zws 70
Next Stories
1 प्रतिजन चाचणी संच संपल्याने नवा पेच
2 डहाणू किनाऱ्यालगत बेकायदा बंगले
3 वैतरणा, पिंजाळ नद्या इशारा पातळीजवळ
Just Now!
X