News Flash

‘एमपीएससी’ने उमेदवारांसाठी सुरू केली नवीन सुविधा

उद्यापासून कार्यान्वित होणार; ऑनलाईन अर्जप्रणाली अथवा सर्वसाधारण प्रकारच्या अडचणींचे होणार निवारण

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित विविध भरतीप्रक्रियेच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्जप्रणाली अथवा सर्वसाधारण प्रकारच्या अडचणी/शंका निवारणासाठी आयोगाकडून १८००-१२३४-२७५ आणि १८००-२६७३-८८९ या टोल फ्री क्रमांकावर मदत केंद्र(हेल्प डेस्क/कॉल सेंटर)ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

या टोल फ्री क्रमांकावर सद्यस्थितीत ऑनलाईन अर्जप्रणाली अथवा सर्वसाधारण स्वरुपाच्या अडचणी/शंकाचे निवारण होईल. तसेच, ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या अनुषंगाने तांत्रिक/सर्वसाधारण पात्रता अथवा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबाबतच्या अडचणींचे निवारण देखील केले जाणार आहे.

वरील टोल फ्री क्रमांकावर प्राप्त होणारे दूरध्वनी संभाषणाचे (टेलिफोन कॉल्स) आयोगाच्या कार्यालयाकडून संनियंत्रण व विश्लेषण केले जाणार आहे.

हे टोल फ्री क्रमांक २ मार्च २०२१ पासून सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते रात्री ८ आणि शनिवार व रविवारी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० कार्यान्वित राहणार असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आलेले आहे. तसेच टोल फ्री क्रमांकाच्या सुविधेव्यतिरिक्त उमेदवारांना support-online@mpsc.gov.in या ईमेल आयडीवर तांत्रिक बाबींच्या अनुषंगाने संपर्क साधता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 4:59 pm

Web Title: toll free help center facility for candidates from mpsc msr 87
Next Stories
1 “मुलाच्या मतदारसंघात ‘पावरी’ होत आहे आणि आमचे मुख्यमंत्री….”
2 “पूजाच्या आई-वडिलांना राठोड यांनी पाच कोटी रुपये दिलेत; त्यामुळेच त्यांना हत्येविषयी काही बोलायचे नाही”
3 विधान परिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले…
Just Now!
X