News Flash

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांवर गुन्हा, उद्या बारामती बंदची हाक

बारामतीकरांनी उद्या बंदची हाक दिली आहे, सरकारने सूडबुद्धीने कारवाई केल्याचं बारामतीच्या नागरिकांनी म्हटलं आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. ही बातमी समोर येताच उद्या बारामती बंदचे आवाहन करण्यात आले आहे. भाजपा सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे असाही आरोप बारामतीकरांनी केला आहे. आदरणीय शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याने बुधवारी बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. बारामतीतील नागरिकांच्या वतीने हुकुमशाही सरकारचा निषेध करण्यासाठी 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता शारदा प्रांगण बारामती या ठिकाणी जमावे असे आवाहनही करण्यात आले आहे. एबीपी माझाने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी  शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण सत्तर जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. मागील तीन वर्षे यासंदर्भातल्या काहीही घडामोडी घडलेल्या नव्हत्या. मात्र विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शरद पवार, अजित पवार यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी एकूण ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही बातमी समजताच बारामतीकरांनी उद्या बारामती बंदची हाक दिली आहे. ईडीने ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोप बारामतीतल्या नागरिकांनी केला आहे. इतकंच नाही तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही ही कारवाई निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने केली आहे असा आरोप केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. मला यासंदर्भातली माहिती नाही. माझ्या दौऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे त्याचमुळे ही कारवाई केली गेल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 10:11 pm

Web Title: tomorrow baramati bandh because of eds action on sharad pawar scj 81
Next Stories
1 ‘वक्त जरुर बदलता है’ पवारांवर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर धनंजय मुंडे यांचा भाजपाला टोला
2 एकाच मतदारसंघासाठी ‘आप’ आणि वंचित बहुजन आघाडीने दिला सारखाच उमेदवार
3 माझ्यावर ईडीकडून गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही- शरद पवार
Just Now!
X