पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या हजारो प्राध्यापकांचे पगार गेल्या दोन वर्षापासून थकलेले असताना दुसरीकडे संस्थेचे अध्यक्ष मारुती नवले यांचा मुलगा रोहीत नवले याचा विवाह सोहळा मात्र मोठ्या ऱाजेशाही थाटात पार पडणार आहे. जिथे नुकतंच प्रियांका आणि निक जोनास यांचा विवाह पार पडला. त्याच जोधपूर येथील उमेद भवन पॅलेसला १७ डिसेंबरला रोहित नवले याचा विवाह श्रुती खरवंदा सोबत होणार आहे.या लग्नाची पत्रिका देखील तशीच महागडी असून या पत्रिकेबरोबर सुका मेवा, महागडी अत्तरं, यासारख्या भेटवस्तू देखील निमंत्रितांना भेट म्हणून दिल्या आहेत.
एवढंच नाही तर गेल्या आठवड्यात रोहीत नवले याच्या लग्नाचा प्री- वेडींग व्हिडिओ समोर आला होता याचं शुटिंग इटलीमध्ये केल्याचीही माहिती समजते आहे.एका बाजूला प्राध्यापकांचे पगार देण्या स चालढकल करताना दुसऱ्या बाजूला मुलाच्या लग्नाचं प्री वेडिंग शूट आणि या लग्नासाठी पैसे आले कुठून असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
रोहित नवलेचा प्री वेडिंग शूट
VIDEO | शिक्षकांचे पगार थकवणाऱ्या मारूती नवलेच्या मुलाच्या लग्नात कोट्यवधींंची उधळपट्टीhttps://t.co/2jrmCKvB4K pic.twitter.com/QzAw0KUrYU
— LoksattaLive (@LoksattaLive) December 15, 2018
मारूती नवलेंनी सिंहगड इन्सिट्युटच्या प्राध्यापकांनी अनेक आंदोलने केली होती. संस्थेने त्यांच्या आंदोलनानंतर वेतन दिले नव्हते तेव्हा प्राध्यापकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यानंतर प्राध्यापकांचे सुमारे 18 कोटी रुपये थकित वेतन तीन टप्प्यात देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. आता याच मारूती नवलेंनी मुलाच्या लग्नात कोट्यवधींची उधळपट्टी केल्याची माहिती समोर आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2018 5:39 pm