News Flash

देशातील दहा उत्कृष्ट पोलीस ठाण्यांमध्ये राज्यातील सर्वच अपात्र

मणिपूरमधील थोंबूल जिल्ह्य़ातील पोलीस ठाण्याला प्रथम क्रमांक

संग्रहित छायाचित्र

मणिपूरमधील थोंबूल जिल्ह्य़ातील पोलीस ठाण्याला प्रथम क्रमांक

मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने निवड करण्यात आलेल्या देशातील दहा उत्कृष्ट पोलीस ठाण्यांच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही पोलीस ठाण्याचा समावेश झालेला  नाही.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने दरवर्षी देशातील दहा पोलीस ठाण्यांना उत्कृष्ट पोलीस ठाण्याचा पुरस्कार दिला जातो. २०२० मधील दहा पोलीस ठाण्यांची यादी गुरुवारी गृहमंत्रालयाने जाहीर केली. मणिपूरमधील थोंबूल जिल्ह्य़ातील पोलीस ठाण्याला पहिला पुरस्कार मिळाला. दुसरा क्रमांक तमिळनाडूतील सालेम शहर तर तिसऱ्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेशमधील चँगलँग जिल्ह्य़ातील पोलीस ठाण्याला मिळाला.

महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या दादरा नगर- हवेली खानवेल पोलीस ठाण्याचा दहा जणांच्या यादीत समावेश आहे.

गोवा, छत्तीसगड, अंदमान आणि निकोबार, सिक्कीम, उत्तर प्रदेश, तेलंगणा या राज्यांमधील पोलीस ठाण्यांचा दहा जणांच्या यादीत समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकाही पोलीस ठाण्याचा समावेश झालेला नाही.

देशातील १६,६७१ पोलीस ठाण्यांमधून दहा पोलीस ठाण्यांना पुरस्कार दिला जातो. यासाठी गृहमंत्रालयाने निकष निश्चित के ले आहेत. प्रत्येक राज्यातून तीन पोलीस ठाण्यांचा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. या यादीतून दहा उत्कृष्ट पोलीस ठाण्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गुन्ह्य़ांचा छडा लावण्याचे प्रमाण, महिला व दुर्बल घटकांच्या विरोधातील गुन्ह्य़ांच्या तपासाचे प्रमाण आदी १९ निकष निश्चित करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 3:09 am

Web Title: top 10 police stations for 2020 announced by by ministry of home affairs zws 70
Next Stories
1 वीजदेयकांची थकबाकी हप्त्याने भरण्याची योजना
2 राज्यात पुन्हा रात्रीचा गारवा
3 सोलापुरातून ४०० टन फळे किसान रेल्वेने दिल्लीच्या बाजारात
Just Now!
X