मोदी सरकारने सीबीआयला ‘प्रायव्हेट आर्मी’ बनवले : काँग्रेस


आंध्र प्रदेश सरकारने सीबीआय संदर्भात जारी केलेला आदेश गंभीर असल्याचे सांगत मोदी सरकारने देशातील सर्वोच्च तपास यंत्रणेला ‘प्रायव्हेट आर्मी’ बनवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने सीबीआयला राज्यात छापेमारीसाठी तसेच तपासासाठी देण्यात आलेली सामान्य परवानगी शुक्रवारी मागे घेतली...सविस्तर वाचा

सातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात


सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करणाऱ्या समितीचा अहवाल या आठवडय़ात किंवा उशिरातउशिरा महिनाअखेपर्यंत राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. त्यामुळे जानेवारी २०१९पासून राज्य कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळेल, अशी माहिती वित्त विभागातील उच्चपदस्थ सूत्राने दिली...सविस्तर वाचा

तृप्ती देसाई मुंबईत परतल्या; विमानतळाबाहेर विरोधात घोषणाबाजी


शबरीमला मंदिरात प्रवेशासाठी केरळमध्ये दाखल झालेल्या भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना कोचीन विमानतळावरुनच मुंबईत परतावे लागले. दरम्यान, मुंबई विमानतळाबाहेर शुक्रवारी शबरीमला मंदिर प्रथा समर्थकांनी देसाईंविरोधात निषेध नोंदवला...सविस्तर वाचा

पत्रीपुलाच्या पाडकामानिमित्त उद्या विशेष मेगा ब्लॉक; पहा कुठल्या गाड्या होणार रद्द


कल्याणमध्ये मध्य रेल्वेकडून उद्या (दि.१८) रेल्वेमार्गावरील ब्रिटिशकालीन पत्रीपूल पाडण्यात येणार आहे. हे काम सुमारे ६ तास (सकाळी ९.३० ते दुपारी ३.३०) चालणार असल्याने या काळात मध्य रेल्वे मार्गावरील सेवा काही काळापुरती बंद ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी काही रेल्वे गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल तर काही गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे पहा कुठल्या गाड्यांच्या वेळापत्रकावर काय परिणाम होणार आहे…सविस्तर वाचा

शिबानीसोबतचा फोटो शेअर केल्यामुळे फरहान झाला ट्रोल


बॉलिवूडमध्ये कायम सेलिब्रेटींच्या ब्रेकअप आणि लिंकअपच्या चर्चा रंगत असतात. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री फरहान अख्तर आणि गायिका शिबानी दांडेकर यांच्या चर्चा रंगल्या आहेत. गेल्या सप्टेंबर महिन्यापासून हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याची सांगण्यात येत असून फरहानने नुकताच शिबानीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. मात्र शेअर केलेल्या या फोटोमुळे फरहानला नेटकऱ्यांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं आहे....सविस्तर वाचा