News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर

राजीव गांधींचा ‘भारतरत्न’ पुरस्कार काढून घ्या, दिल्ली विधानसभेत प्रस्ताव मंजूर

भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र पुरस्कार परत घेण्यात यावा असा प्रस्ताव दिल्लीच्या विधानसभेत मंजूर करण्यात आला. आम आदमी पार्टीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे…वाचा सविस्तर

आरक्षणातून भाजपने मराठा-ओबीसींमध्ये भांडणे लावली


निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मराठा समाजाला आरक्षण देऊन आपला राजकीय स्वार्थ साधला आहे, मात्र त्यातून मराठा व ओबीसी समाजात भांडणे लागली आहे, संघर्ष निर्माण होणार आहे, असे मत बहुचन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले….सविस्तर वाचा

सिंधुदुर्गात भाजप, राणेंना धक्का देण्याची काँग्रेसची तयारी


नारायण राणे यांचे एकेकाळचे समर्थक, नंतर भाजपमध्ये गेलेले काका कुडाळकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कुडाळकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून भाजप व राणे यांना धक्का देण्याची काँग्रेसने तयारी केली आहे…सविस्तर वाचा

आयपीएलद्वारे स्मिथची विश्वचषकाची तयारी


पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या तयारीचा भाग म्हणून इंडियन प्रीमियर लीगकडे पाहात असल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने सांगितले.…सविस्तर वाचा

मनातल्या भावना व्यक्त केल्याने मी गद्दार ठरतो का?-नसीरुद्दीन शाह


मी माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या तर मी गद्दार कसा काय झालो असा प्रश्न आता ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी उपस्थित केला आहे. मी एक भारतीय आहे. या देशाबद्दल मला जे प्रश्न पडले आहेत ते मी उपस्थित केले त्यात माझे काय चुकले की मला गद्दार ठरवले जाते आहे? असाही प्रश्न नसीरुद्दीन शाह यांनी विचारला आहे…सविस्तर वाचा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 9:18 am

Web Title: top 5 news morning bulletin 22dec 2018
Next Stories
1 राजीव गांधींच्या ‘भारतरत्न’वरुन आपमध्ये जुंपली, आमदार अलका लांबा देणार राजीनामा ?
2 अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांचा राजीनामा
3 पुराव्याअभावी सर्व निर्दोष सोहराबुद्दीन चकमक प्रकरण
Just Now!
X