मॉर्निंग बुलेटिन: पाच महत्त्वाच्या बातम्या

१. राहुल गांधी, सुरजेवालांविरोधात अहमदाबाद सहकारी बँकेचा अब्रुनुकसानीचा दावा

वर्ष २०१६ मध्ये नोटाबंदी दरम्यान पाच दिवसांत ७५० कोटी रूपयांचे जुने चलन बदलून घेतल्याचा बँकेवर आरोप केल्याप्रकरणी अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेने (एडीसीबी) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि रणदिप सुरजेवाला यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. वाचा सविस्तर..

२. आता ड्रोनद्वारे होणार वस्तूंची डिलिव्हरी, १ डिसेंबरपासून संपूर्ण देशात ड्रोन उड्डाणाला परवानगी

ई-कॉमर्स साईटवर एखाद्या वस्तूची किंवा खाद्य पदार्थाची ऑर्डर दिल्यानंतर उद्या ड्रोनद्वारे घरपोच डिलिव्हरी मिळाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण सोमवारीच केंद्रीय नागरी हवाई उड्डयाण मंत्रालयाने ड्रोनच्या वापरासंदर्भातील धोरण जाहीर केले आहे. वाचा सविस्तर..

३. पश्चिम महाराष्ट्रावर ओल्या दुष्काळाचे संकट

दोन-अडीच महिने धो-धो बरसणाऱ्या संततधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या सुमारे १६ तालुक्यांत ओल्या दुष्काळाचे संकट उद्भवले आहे. वाचा सविस्तर..

४. कनिष्ठ न्यायालयांतील संभाव्य न्यायाधीशांना मराठीचे ज्ञान हवे!

राज्यातील कनिष्ठ न्यायालयांतील संभाव्य न्यायाधीशांना मराठी भाषेचे ज्ञान अवगत असणे बंधनकारक आहे, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. वाचा सविस्तर..

५. मुंढे यांच्यावरील अविश्वास प्रस्तावामुळे नाशिककरांमध्ये नाराजी

शिस्तबद्ध, नियमाधारित कामांच्या दंडकाने अस्वस्थ झालेल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी खुद्द मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेले पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यावर १ सप्टेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभेत निर्णय होणार आहे. वाचा सविस्तर..