देशात सर्वाधिक कर्जाचा बोजा महाराष्ट्रावर!


देशातील सर्व राज्यांचा विचार केल्यास महाराष्ट्रावर सर्वाधिक कर्जाचा बोजा असला तरी राज्याच्या सकल उत्पन्नाच्या तुलनेत हे प्रमाण देशातील सर्वात कमी आहे. राज्य सकल उत्पन्न अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे चांगले असल्यानेच कर्जाचा बोजा वाढत असला तरी परिस्थिती चिंताजनक नाही. सविस्तर वाचा… 

६० हजारासाठी हत्या, मृतदेहाचे त्याने केले ३०० तुकडे


केवळ ६० हजार रुपयांसाठी आपल्याच मित्राची हत्या करून सलग तीन दिवसात मृतदेहाचे ३०० तुकडे केल्याचा आणि माणुसकीला काळिमा फासणारा घृणास्पद प्रकार विरार परिसरात घडला. दुर्गंधीने ट्रस्ट सोसायटीच्या साफसफाई अभियानात हा प्रकार उघडकीस आला. सविस्तर वाचा ..

अमेरिकेतील बँकेत अंदाधुंद गोळीबार, पाच जणांचा मृत्यू


अमेरिकेत फ्लोरिडा येथे बँकेच्या आतमध्ये झालेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. संशयित हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आहे. झीफेन एव्हर असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे. झीफेन सरळ सीब्रिंग येथील सन ट्रस्ट बँकेच्या आतमध्ये चालत गेला व त्याने अंदाधुंद गोळीबार केला…सविस्तर वाचा… 

विश्वचषकासाठी ऋषभ पंतला संघात जागा मिळेलं याची खात्री नाही !


भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या मते ऋषभ पंतला भारतीय संघात जागा मिळण्याची शक्यता जरा कमीच आहे. बंगळुरुत एका खासगी कार्यक्रमात बोलत असताना गौतमने विश्वचषकासाठी धोनी आण दिनेश कार्तिक हेच योग्य उमेदवार असल्याचं म्हटलंय.…सविस्तर वाचा

‘तुला पाहते रे’ बंद होण्याच्या चर्चांवर सुबोध म्हणतो..


सुबोध भावे, गायत्री दातार यांची प्रमुख भूमिका असलेली ‘तुला पाहते रे’ मालिका अल्पावधितच छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ठरली. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सुरु झालेली ही मालिका सातत्याने टीआरपी रेटिंग्जमध्ये वरच्या क्रमांकावर राहिलीये. ही मालिका बंद होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे यावर सुबोधनं स्पष्टीकरण दिलं आहे...वाचा सविस्तर