१. सांगली गर्भपात प्रकरण : मुख्य संशयित डॉ. विजयकुमार चौगुलेला अटक

चौगुले हॉस्पिटलमध्ये गर्भपात करून भ्रूणांची हत्या केल्याप्रकरणी मुख्य संशयित डॉ. विजयकुमार चौगुले याला मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली. पत्नी डॉ. रूपाली शहा यांची न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केल्यानंतर आज सकाळी डॉ. चौगुले पोलिसांना शरण आले. मात्र, या हॉस्पिटलचा नर्सिंग परवाना असलेले डॉ. स्वप्नील जमदाडे अद्याप फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. वाचा सविस्तर :

२. आयाराम, गयाराम व घाशीरामांमुळे गोव्यात संकट, शिवसेनेचा भाजपावर निशाणा

गोव्यात भाजपाने मोडतोड तांबापितळ एकत्र करून सरकार स्थापन करुन लोकशाहीचा अपमानच केला होता. शेवटी हे नवे राज्य गोव्यास व भाजपास फळले नाही. पर्रिकर यांना दिल्लीतच ठेवून गोव्यात नवी घडी निर्माण करता आली असती व राज्यही स्थिर चालले असते. तसे झाले असते तर पर्रीकरांनंतर कोण? हा प्रश्न आज निर्माण झाला नसता. गोव्याच्या आजच्या स्थितीस भाजपच जबाबदार आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. वाचा सविस्तर :

३. बांगलादेशातील रोहिंग्यांसाठी भारताकडून ११ लाख लिटर केरोसिन
म्यानमारमधील लष्करी कारवाईनंतर बांगलादेशात आश्रयास आलेल्या रोहिंग्या शरणार्थीसाठीच्या मदतीचा तिसरा टप्पा भारताने बांगलादेशकडे सुपुर्द केला असून त्यात ११ लाख लिटर केरोसिन व २० हजार स्टोव्हचा समावेश आहे. बांलागदेशमध्ये रोहिंग्या शरणार्थीची संख्या सात लाख असून त्या देशाने आंतरराष्ट्रीय समुदायाने या प्रश्नी म्यानमारवर दडपण आणण्याची मागणी केली होती. म्यानमारमधील रखाइन प्रांतात लष्कराच्या अत्याचारांमुळे सात लाख रोहिंग्या शरणार्थी बांगलादेशात आले आहेत.वाचा सविस्तर :

 

४. ज्येष्ठांना ‘बेस्ट’चे निम्मे तिकीट
वाढत्या तोटय़ामुळे विस्कटलेली घडी सावरण्यासाठी बेस्ट उपक्रमाला विविध सवलतींच्या योजना कुलूपबंद कराव्या लागल्या. मात्र ज्येष्ठ नागरिकांना निम्म्या तिकिटामध्ये बेस्ट बसमधून प्रवास करता यावा यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. या योजनेसाठी पालिकेकडून बेस्ट उपक्रमाला २०१८-१९ या वर्षांसाठी तीन कोटी रुपये देण्यात येणार आहे. मात्र मुंबईत वास्तव्यास असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. वाचा सविस्तर :

 

५.  मुस्लीमांना स्वीकारणे हेही हिंदुत्वच !
हिंदुत्व म्हणजे समावेशकता आणि मुस्लीमांना आपले मानणे हा त्याचाच एक भाग आहे. हिंदू राष्ट्र म्हणजे तेथे मुस्लीमांना जागा नाही, असा होत नाही. जर आपण मुस्लीमांना स्वीकारत नसू तर ते हिंदुत्व नाही. हिंदुत्व हे भारतीयत्व आणि सर्वसमावेशकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी केले. वाचा सविस्तर :  

सरसंघचालक मोहन भागवत