News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा सकाळच्या महत्वाच्या बातम्या

टॉप ५

१. नीरव मोदीसह १६० बंगल्यांची चौकशी
पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहारातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्यासह काही नामवंतांना अलिबागच्या किनाऱ्यावर बंगला बांधू देणे हे अत्यंत धक्कादायक असून सरकारी यंत्रणांचा विशेषत: जिल्हाधिकारी कार्यालयाचा भोंगळ कारभार त्यासाठी सर्वस्वी जबाबदार आहे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सोमवारी ताशेरे ओढले. अलिबागच्या समुद्रकिनारी मोदी याच्यासह १६० खासगी बेकायदा बंगले कसे उभे राहिले, याच्या चौकशीचे आदेश न्यायालयाने कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांना दिले आहेत. वाचा सविस्तर :

(नीरव मोदी)

२. भाजपला घाबरलेल्या दोन्ही काँग्रेसने हिमतीवर स्वतंत्र लढून दाखवावेच

भाजपच्या झंझावाताला घाबरूनच दोन्ही काँग्रेस एकत्र येत आहेत. तरी, त्यांनी हिम्मत असले तर स्वतंत्र लढून दाखवावेच असे आमचे आव्हान असल्याचे सांगताना, कोल्हापूर, सांगलीप्रमाणेच सातारा जिल्ह्यतही भाजपचा करिश्मा दिसून येईल, असा विश्वास राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. वाचा सविस्तर  : 

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

३. इंधनाचा भडका थांबेना, पेट्रोल – डिझेल महागले
सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारीही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले. मुंबईत मंगळवारी पेट्रोल १० पैशांनी तर डिझेल ९ पैशांनी महागले. मुंबईत मंगळवारी पेट्रोलचा प्रति लिटर दर ८९ रुपये ५४ पैसे तर डिझेलचा प्रति लिटर दर ७८ रुपये ४२ पैसे आहे. वाचा सविस्तर :

४. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोकशाहीप्रधान संघटना : सरसंघचालक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वात लोकशाहीप्रधान संघटना आहे. संघात कोणा एकाची मनमानी चालत नाही. संघ विचारांवर अंकुश ठेवत नाही. संघाच्या शाखांपासून प्रतिनिधी सभेपर्यंत विविध स्तरांवर विचारांचे आदानप्रदान, चर्चा केली जाते. त्यातूनच एखाद्या मुद्दय़ावर अखेर सहमती होते. हीच संघाची अत्यंत खुली कार्यपद्धती असल्याचे विवेचन सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी केले. वाचा सविस्तर :

सरसंघचालक मोहन भागवत

५. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची ४०० कोटींची फसवणूक?

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या साखर कारखान्यांवर कठोर कारवाईचा इशारा सरकार वारंवार देत असले तरीही राज्यातील ४८ साखर कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे किमान आधारभूत किमतीचे (एफआरपी) ४०० कोटी रुपये व दोन वर्षांपूर्वीच्या हंगामातील ७७ कोटी रुपयांची देणी अद्याप दिलेली नसल्याची बाब उजेडात आली आहे. वाचा सविस्तर :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 8:30 am

Web Title: top five morning news bulletin160 bungalow inquiries with nirav modi
Next Stories
1 चाकरमान्यांचे हाल, रत्नागिरीत संतप्त प्रवाशांनी पॅसेंजर ट्रेन रोखली
2 नीरव मोदीसह १६० बंगल्यांची चौकशी
3 साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची ४०० कोटींची फसवणूक?
Just Now!
X