दीड शहाण्यांनी आधी समजून घ्यावे; राज ठाकरेंना शिवसेनेचे प्रत्युत्तर

संग्रहित छायाचित्र

शिवसेना सत्तेतून बाहेर का पडत नाही, असा सवाल विचारणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अन्य विरोधकांना शिवसेनेने गुरुवारी ‘सामना’च्या अग्रलेखातून प्रत्युत्तर दिले. शिवसेना सरकारमध्ये राहून काय करते, असे उगाचच तोंडाचे डबडे वाजवत राहणाऱ्या दीड शहाण्यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने उठवलेला आवाज नीट समजून घेतला पाहिजे, अशा शब्दात शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे…सविस्तर वाचा

राफेल घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करा; यशवंत सिन्हांची सुप्रीम कोर्टात याचिका

(संग्रहित छायाचित्र)

राफेल करारात घोटाळा झाला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारी याचिका यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि प्रशांत भूषण यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयला तपास करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. सविस्तर वाचा

शमशूल वकारच्या सुटकेसाठी सागरी मार्गाने भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

अनंतनाग तरूंगात कैद असलेल्या शम्शुल वकारला सोडवण्यासाठी पाकिस्तानचे दहशतवादी सागरी मार्गाने भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. नवभारत टाईम्सने गुप्तचर यंत्रणेच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे. गुप्तचर यंत्रणेला मिळेलेल्या माहितीनुसार, सीमारेषावर दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यात सतत अपयश येत असल्यामुळे सागरी मार्गाने आक्रमण करण्याची तयारी सुरू केली आहे…सविस्तर वाचा

पिंपरीतील दळवीनगरमध्ये अग्नितांडव, दोघांचा मृत्यू


पिंपरीतील दळवीनगर झोपडपट्टीत गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागली. या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाला असून या अग्नितांडवात पाच घरं जळून खाक झाली आहेत. प्रदीप मेटे आणि शंकर क्षीरसागर अशी या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. सविस्तर वाचा

#MeToo : तनुश्रीने माझ्यावर बलात्कार केला; राखी सावंतचा धक्कादायक आरोप

संग्रहित छायाचित्र

अभिनेत्री राखी सावंत आणि वादग्रस्त विधान हे समीकरण जणू ठरलेलंच. तनुश्री दत्तावर केलेल्या आरोपांवर राखी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अशातच तिने आणखी एक धक्कादायक विधान केलं आहे. तनुश्री दत्ता ही समलैंगिक असून तिने माझ्यावर बलात्कार केला असा आरोप राखीनं केला आहे. एका पत्रकार परिषेदत तिने हे वक्तव्य केलं आहे….सविस्तर वाचा