News Flash

चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; २०० चिमण्या, ७ बैलांचा मृत्यू

चंद्रपूर शहरात रविवारी सर्वदूर पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

(संग्रहित छायाचित्र)

चंद्रपूर जिल्ह्यात आज सर्वदूर विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस झाला. या पावसात चिमूर तालुक्यातील नेरी येथे २०० चिमण्यांचा तर राजुरा व मूल येथे ७ बैलांचा मृत्यू झाला.

चंद्रपूर शहरात रविवारी सर्वदूर पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पावसाच्या पाण्याने अनेक भागात झाडे कोसळली, विजांच्या तारा तुटल्या, रस्त्यावर पाणी साचले, चिमूर तालुक्यातील नेरी येथे मनोज मामीडवार यांचे घरातील अंगणात झाडावर बसलेल्या २०० चिमण्या मुसळधार पावसात मृत्यू पावल्या. राजुरा तालुक्यातील पोवनी येथे आज सकाळी वीज पडून एका गायीचा आणि गोयगाव येथे विजेचा तार तुटल्याने त्याचा शॉक लागून तीन बैल व दोन दुभत्या गाईचा मृत्यू झाला. यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

राजुरा परिसरात आज सकाळी आठ वाजता मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यावेळी तालुक्यातील पोवनी येथील भूषण कावळे यांच्या गाईच्या अंगावर वीज पडून ती जागीच गतप्राण झाली. आज दुपारी मृत गायीचा पंचनामा करण्यात आला.

गोयगाव येथे वनकर यांचे शेतात विदयुत प्रवाह सुरु असलेली तार तुटली होती. या शेतात गुरे चरत होती. परंतू सकाळी गावात विदयुत प्रवाह नसल्याने याची माहिती कुणाला मिळाली नाही. सकाळी अकरा वाजता वीज प्रवाह आल्यावर येथे चरत असलेल्या तीन बैल व दोन गाईना विजेचा शॉक लागून ती जागीच गतप्राण झाली. यातील हरीदास गौरकर यांचे दोन बैल, विनोद पडवेकर यांचा एक बैल, पुरुषोत्तम वनकर यांची एक गाय व विलास मुसळे यांची एक गाय अशी पाच गुरे मृत्यूमुखी पडली.

शेतीच्या हंगामात बैल व दूध देणाऱ्या गाईंचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. येथेही पंचनामा करण्यात आला. या सर्व नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी गावक-र्यांची मागणी आहे. मूल येथे एक बैल मृत्यू पावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2020 8:07 pm

Web Title: torrential rains in chandrapur district 200 sparrows 7 bulls dead aau 85
Next Stories
1 महाविकास आघाडीच ठरलं! विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार
2 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पडणारच; छत्रपती संभाजी राजे यांचं आश्वासन
3 पश्चिम बंगालमधील मजूर निघाले पायी; रेल्वे परवानगीसाठी फडणवीसांची ममता बॅनर्जींकडे विनंती
Just Now!
X