26 September 2020

News Flash

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांची एकूण संख्या सहाशेवर

जिल्ह्यातील २६ जणांचा या महामारीमुळे मृत्यू

प्रतिकात्मक छायाचित्र

रत्नगिरी जिल्ह्यात नव्याने १५ करोनाबाधित रूग्ण आढळल्याने गेल्या मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६१४ झाली आहे.

दरम्यान दिवसभरात १० रूग्ण बरे होऊन घरी गेल्यामुळे बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या ४४९ झाली असून १३९ रूग्णांवरउपचार चालू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील २६ जणांचा या महामारीमुळे मृत्यू ओढवला आहे.

नव्याने सापडलेल्या करोनाबाधित रुग्णांपैकी लोटे (खेड)६, कापसाळ व गोवळकोट (चिपळूण) प्रत्येकी ३, खेड— २ आणि रत्नागिरी तालुक्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. तीन दिवसांपूर्वी रत्नागिरीत सापडलेल्या एका करोनाबाधित रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. अहवाल येण्यापूर्वी सुमारे २५  ते ३० लोक त्याच्या संपर्कात आले होते, अशी माहिती आहे.

जिल्ह्यात सध्या ६२ ‘प्रतिबंधित क्षेत्रे’ आहेत.  संस्थात्मक विलगीकरण कक्षात ६७ संशयित करोना रुग्ण दाखल आहेत, तर अखेर गृह विलगीकरणाखाली असलेल्यांची संख्या १६ हजार ८२५ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 12:20 am

Web Title: total number of coronet victims in ratnagiri district is over six hundred abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 हिरे रुग्णालयातील अतिदक्षता कक्ष तत्काळ सुरू करा -पालकमंत्री
2 जळगावात एक लाख ४१ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप
3 वारकरी संप्रदायाची त्यागाची वारी
Just Now!
X