नागाव समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या मुंबईतील सात पर्यटकांपकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. सहदेव गणपत चव्हाण असे या पर्यटकाचे नाव आहे.
मुंबईतील मालाड परिसरात राहणारे सात मित्र रविवारी नागाव येथे फिरायला आले होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हे सर्व जण पोहण्यासाठी समुद्रात उतरले. त्यांपकी सहदेव याला पाण्याचा अंदाज आला नाही व तो समुद्रात बुडाला. त्याला बाहेर काढून तातडीने अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.