19 November 2019

News Flash

‘वेण्णा लेक’ मध्ये पर्यटक बुडाला

बोटिंग करत असताना घेतली पाण्यात उडी

महाबळेश्वर येथील वेण्णा लेकमध्ये बोटिंग करत असताना एका पर्यटकाने पाण्यात उडी मारली. हा पर्यटक बुडाला असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

महाबळेश्वर येथील वेण्णा लेक येथे बुधवारी दुपारी चार मित्र पर्यटनासाठी आले होते. तिथे ते बोटिंग करत असताना महेश दादासाहेब रिटे (वय ३० ) याने पाण्यात उडी मारली व तो बुडाला. हे पाहून अन्य एका मित्रानेही पाण्यात उडी मारली मात्र तो परत आला. बुडालेल्या महेश शिंदे याची शोध मोहिम सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू होती. पोलिसांनी त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले असुन, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. अहमद शेख (३०), युवराज अर्जुन म्हेत्रे (३२ ), बशीर तय्यब शेख (३०) सर्वजण जमखेडचे रहिवासी आहेत.

दरम्यान एकजण बुडल्याचे समजताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. पोलिस अधिकारी व कर्मचारी, सह्याद्री ट्रेकर्स, नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

First Published on June 12, 2019 9:48 pm

Web Title: tourists drop off in venna lake msr 87
Just Now!
X