09 March 2021

News Flash

जळगावात ट्रॅक्टरने दोन शाळकरी मुलांना चिरडले

अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रॅक्टर पेटवला

प्रतिनिधिक छायाचित्र

भरधाव ट्रॅक्टरने रिक्षाला दिलेल्या धडकेत दोन शाळकरी मुलांना चिरडले. ही घटना गुरूवारी सकाळी सातच्या सुमारास आडगाव (ता. यावल, जि. जळगाव) येथे घडली. अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने ट्रॅक्टर पेटवून दिला.

हे दोन्ही विद्यार्थी रिक्षातून शाळेल चालले होते. त्यावेळी भरधाव येत असलेल्या ट्रॅक्टरने रिक्षाला उडवले. यात नववीत शिकणारे हे दोन्ही विद्यार्थी चिरडले गेले. अपघात इतका भीषण होता की, दोघांचाही चेंदामेंदा झाला होता. अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता. अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने ट्रॅक्टर चालकाला बेदम मारहाण केली. नंतर त्यांनी तो ट्रॅक्टरही पेटवून दिला. या ट्रॅक्टरमधून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याचे सांगण्यात येते. जमावाने तिथे उपस्थित असलेल्या पोलिसालाही मारहाण केल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 1:50 pm

Web Title: tractor crushed two student the mob set on fire in jalgaon district
Next Stories
1 अहमदनगरमधील टुरिझम फोरमचा काश्मीरमधील पर्यटनावर बहिष्कार
2 दहावी-बारावीची परीक्षा तंत्रज्ञान सुसज्ज कधी होणार?
3 लाल वादळ धडकणार, शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना
Just Now!
X