News Flash

गोंदियात भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

गोंदिया-आमगाव राज्यमार्गावरील खमारी गावाजवळील नाल्याजवळ बुधवारी सकाळी ट्रॅक्टरला ट्रकने धडक दिली.

प्रतिकात्मक छायाचित्र

गोंदिया – आमगाव राज्य महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तर एक जण या अपघातात जखमी झाला आहे. मोरेश्वर हीरालाल कटरे (वय २८) आणि प्रवीण कुंभरे अशी या मृतांची नावे आहेत.

गोंदिया-आमगाव राज्यमार्गावरील खमारी गावाजवळील नाल्याजवळ बुधवारी सकाळी ट्रॅक्टरला ट्रकने धडक दिली. वळण असल्याने ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. ट्रकमध्ये लोखंडी सळ्या होत्या. तर ट्रॅक्टरमध्ये वाळू होती. या अपघातात ट्रक आणि ट्रॅक्टरच्या चालकाचा मृत्यू झाला. मोरेश्वर हीरालाल कटरे (वय २८) आणि प्रवीण कुंभरे अशी या चालकांची नावे आहेत. तर राजेन्द्र भोंडे हा गंभीर जखमी झाला असून त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 10:44 am

Web Title: tractor truck collision on gondia amgaon highway kills two
Next Stories
1 चमत्काराने बेपत्ता व्यक्ती शोधण्याचा दावा; जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
2 पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा दर
3 ३३,००० रुद्राक्षांनी साकारली शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा; जयंतीनिमित्त अभिवादन
Just Now!
X