वीक एंड आणि नाताळची सुट्टी या पार्श्वभूमीवर मुंबई – गोवा महामार्गावर शनिवारी सकाळपासून वाहतूक कोंडी झाली आहे. पनवेल – पेण – माणगावपर्यंत वाहतूक कोंडी झाली असून या कोंडीला कंटाळून अनेक अवजड वाहनचालकांनी मार्गावरील ढाबा आणि पेट्रोल पंपावर आसरा घेतला आहे.

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक पर्यटकांची पावले कोकण आणि गोव्याकडे वळतात. वीक एंड आणि नाताळची सुट्टी लागून आल्याने शनिवारपासूनच मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. जिते, पेण, वडखळ, गडब, माणगाव पर्यंत जागोजागी वाहतुक कोडी झाली असून वाहतूक कोडीमुळे चालकांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. वाहतूक पोलीस कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मुंबई आणि गोवा या दोन्ही दिशेकडील मार्गावर कोंडी झाली आहे. कोंडीमुळे अवजड वाहने रस्त्याच्या कडेला थांबली असून अनेक ट्रकचालकांनी पेट्रोल पंप आणि ढाब्यावर आसरा घेतला आहे.