News Flash

Video : वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं, नागपुरमधील धक्कादायक घटना

नागपुरच्या सक्करदरा चौकातील सिनेस्टाईल थरार सीसीटीव्हीत कैद...

कारवाईपासून वाचण्यासाठी वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना नागपुरमध्ये घडली आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ट्रॅफिक पोलीस वाहन चालकांची तपासणी करत असताना हा प्रकार घडल्याचं समजतंय.

आकाश चव्हाण असं आरोपीचं नाव असून तो यवतमाळ जिल्ह्यातील केळापूरचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. नागपुरच्या सक्करदरा चौकात ही धक्कादायक घटना घडली आहे. वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कारचालकाला चौकात तैनात असलेल्या एका वाहतूक पोलिसाने रोखण्याचा प्रयत्न केला. कारचालक गाडी थांबवत नसल्याचं लक्षात येताच पोलीस हवालदार थेट कारसमोर उभे राहिले. पण तरीही चालकाने कार न थांबविता वाहतूक पोलिसालाच काही मीटर अंतरापर्यंत बोनेटवरून फरफटत नेले. यावेळी त्याने आपल्या कारने अन्य काही गाड्यांनाही धडक मारली. पोलिसाने प्रसंगावधान राखत बोनेटवरून उडी घेतल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावल्याची माहिती आहे.


दरम्यान, पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तीन दिवसांपूर्वी औरंगाबादमध्येही अशीच घटना उघडकीस आली होती. एका रिक्षाचालकाने ट्रॅफिक पोलिसाला फरफटत नेले होते, यात त्यांचा उजव्या पायाला जबर दुखापत झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 1:57 pm

Web Title: traffic policeman dragged on car bonnet in nagpur caught on camera see viral video sas 89
Next Stories
1 व्यावसायिक महाविद्यालयांच्या शिष्यवृत्तीसाठी ५०० कोटींची तरतूद
2 नागपुरात ऑक्सफोर्डच्या लसीची दुसरी मात्र देण्याचे काम उद्या पूर्ण
3 तंत्रनिकेतन प्रवेशासाठी ५ डिसेंबपर्यंत नोंदणीला मुदतवाढ
Just Now!
X