22 February 2020

News Flash

मोटरमनची माणुसकी! जखमी प्रवाशासाठी उलटी धावली ट्रेन

जळगावमधील मोटरमनने जे काही केलं आहे ते पाहिल्यानंतर तुमचा माणुसकीवर विश्वास बसेल

चालत्या ट्रेनमधून खाली पडून एखादा प्रवासी जखमी किंवा मृत्यू झाल्याचा अनेक घटना तुम्ही आजपर्यंत ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. ट्रेनमधून खाली पडल्यानंतर अनेकदा मदत न मिळाल्याने एखाद्या प्रवाशाला आपले प्राणही गमवावे लागतात. पण जळगावमधील मोटरमनने जे काही केलं आहे ते पाहिल्यानंतर तुमचा माणुसकीवर विश्वास बसेल. जखमी प्रवाशासाठी मोटरमनने ट्रेन थांबवून चक्क दीड किमी मागे घेतली. जळगावमध्ये ही घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील परधाडे माहिजी दरम्यान ही घटना घडली.

झालं असं की, राहुल पाटील हा तरुण देवळाली भुसावळ शटलने प्रवास करत होता. प्रवासादरम्यान ट्रेन ते माहिजी दरम्यान असताना राहुल पाटील ट्रेनमधून खाली पडला. राहुल पाटील खाली पडल्याचं दिसताच त्याच्या मित्रांनी चेन खेचून ट्रेन थांबवली. पण राहुल जिथे पडला होता त्याच्यापासून ट्रेन दीड किमी पुढे आली होती. यामुळे प्रवाशांनी त्याला मदत करण्यासाठी मोटरमनला ट्रेन मागे घेण्याची विनंती केली. अखेर मोटरमननेही माणुसकी दाखवत ट्रेन दीड किमी मागे घेतली. यामुळे काही वेळासाठी ट्रेन उलट्या दिशेने धावत असल्याचं चित्र पहायला मिळालं.

मोटरमन आणि रेल्वे प्रशासनाने दाखवलेल्या माणुसकीमुळे राहुल पाटील याचे प्राण वाचले असून त्याच्या कुटुंबियांना आभार मानले आहेत. दरम्यान मोटरमनने दाखवलेल्या माणुसकीचं जिल्ह्यासहित सगळीकडे कौतुक होत आहे.

First Published on February 7, 2020 11:37 am

Web Title: train runs opposite site for injured passenger in jalgaon sgy 87
Next Stories
1 #Coronovirus: चीनच्या ‘हिरो’चं निधन, व्हायरसबद्दल सर्वात आधी चेतावणी देणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू
2 Video: हस्ताक्षर आहे की प्रिंटचा फॉण्ट?; व्हिडिओ पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल
3 Redmi Note मालिकेतील लोकप्रिय फोनला लागली आग, नका करु ‘ही’ चूक