11 August 2020

News Flash

बदलीच्या आदेशावर गृहमंत्र्यांची स्वाक्षरीच नाही -पटेल

मुख्यमंत्र्यांना न दाखवता घाईत या बदल्या झाल्या

संग्रहित छायाचित्र

राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून चर्चा झडत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीच्या पत्रावर गृहमंत्री देशमुख यांची स्वाक्षरी नव्हतीच, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी करून सरकारमधील वाद शमवण्याचा प्रयत्न केला.  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मतभेद नाहीत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली आहे. हे खरे आहे. मात्र, मुंबईत आयुक्तांच्या अंतर्गत या बदल्या झाल्या. त्यांच्या बदलीच्या पत्रांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांची स्वाक्षरी नव्हती. या बदल्या महत्त्वाच्या होत्या. मुख्यमंत्र्यांना न दाखवता घाईत या बदल्या झाल्या, असेही खासदार पटेल म्हणाले.

देशमुख यांनी केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्या आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना न विचारता या बदल्या केल्या होत्या का, असा प्रश्न केला जात होता. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याच्या चर्चा वारंवार होतात. मात्र आघाडी सरकारमध्ये समन्वय समिती आहे. त्यामध्ये तिन्ही पक्षांचे दोन-दोन मंत्री आहेत. त्यामध्ये महत्त्वाच्या मुद्यांवर नियमित चर्चा होतात, असे स्पष्टीकरण पटेल यांनी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 12:11 am

Web Title: transfer order does not have the signature of the home minister praful patel abn 97
Next Stories
1 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड
2 शेतकरी तक्रार निवारण पंधरवाडा पाळा
3 चंद्रपूर जिल्हातील चिमूर, भद्रावती व ब्रह्मपुरी शहरात लॉकडाउन
Just Now!
X