परिवहन मंत्री अनिल परब यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, हसन मुश्रीफ, बच्चू कडू, नितीन राऊत, एकनाथ शिंदे यां मंत्र्यांनाही करोनाची बाधा झाली होती. त्यापाठोपाठ आता परिवहन मंत्री अनिल परबही करोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार अनिल परब यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. रविवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठक झाली या बैठकीला अनिल परब हजर होते. आत्तापर्यंत महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, समाज कल्याण मंत्री धनजंय मुंडे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उर्जामंत्री नितीन राऊत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, कामगार व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही करोनाची लागण झाली होती. त्यापाठोपाठ आता परिवहन मंत्री अनिल परब यांनाही करोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.