31 March 2020

News Flash

रायगडमधील आंबेनळी घाटात दरड कोसळली; महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक बंद

उद्या सकाळी दरड हटवण्याचे काम सुरु होणार

रायगडमधील आंबेनळी घाटात दरड कोसळली

रायगडमधील आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने पोलादपूर महाबळेश्वर दरम्यान वाहतूक ठप्प झाली आहे. महाबळेश्वर परिसरात सुरु असेलेल्या संततधार पावसामुळे ही दरड कोसळली असून उद्या सकाळी दरड हटवण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. गेल्या महिन्याभरात आंबेनळी घाटात दरड कोसळण्याची ही दुसरी घटना आहे.

संध्याकाळी साडेसातच्या सुमारास प्रतापगडाच्या पायथ्याशी रस्त्यावर मातीचा मोठा ढिगारा कोसळला. या घटनेनंतर पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. रात्रीच्या काळोखात घाटरस्त्यावर दरडी हटवण्याचे काम करणे शक्य नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून दरड हटवण्याचे काम सकाळी सुरु केले जाणार आहे. संततधार पावसामुळे पाण्यासोबत मातीचे ढिगारे खाली येत आहेत. जेसीबी मशीनच्या मदतीने हे ढिगारे हटवण्याचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र पुन्हा मोठा मातीचा ढिगारा खाली आल्याने रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2017 10:50 pm

Web Title: transportation stuck due to landslide at raigads ambenali ghat
टॅग Raigad
Next Stories
1 सोलापूर: छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
2 अनधिकृत झोपडीवरील कारवाईनंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्याला घरात घुसून मारहाण
3 नांदेड भाजपत जुने निर्वासित, तर नवे प्रस्थापित!
Just Now!
X