बंदोबस्तासाठी ‘मिथाइल युजेनोल’; शास्त्रज्ञांची संयुक्त संशोधन मोहिम

डहाणू: आंबा व चिकू फळावर घोंगावणाऱ्या फळमाशीच्या संकटावर मात करण्यासाठी कोसबाड कृषी विज्ञान केंद्र व भाभा अणुशक्तीमार्फत संयुक्त संशोधन सुरू असून या माशीची वंशावळच रोखण्यासाठी शास्त्रज्ञांनी ‘मिथाइल युजेनोल’चा सापळा लावला आहे. यामुळे नर माश्यांवर परिणाम होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

विशेषत: आंबा, चिकु फळाचे नुकसान होऊन उत्पादनावर परिणाम होऊन बागायतदारांचे आर्थिक नुकसान होत आहे. गतवर्षी मे, जून आणि जुलै हा महिन्यांमध्ये  बागायती पिकावर फळमाशीचा प्रादुर्भाव वाढळला. त्यानंतर उत्पादन घटून बाजारभावावर परिणाम झाला. मे ते जुलै या तीन महिन्यांत आंबा फळाचा हंगाम असतो. फळमाशीचे आंबा हे मुख्य खाद्य असल्याने या काळात, या माशीची प्रजननशक्ती मोठ्या प्रमाणात वाढते असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सापळ्यामध्ये ‘मिथाइल युजेनोल’ नावाचे रसायन नर माशीला आकर्षित केल्याने, कीटकनाशकामुळे नर मरतात. त्यांची संख्या कमी होऊन मादी वांझ प्रकारातील अंडी घालते. त्यामुळे अळ्या तयार होत नाहीत.

आंबा आणि चिकू फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव वाढल्याने रोगनियंत्रणासाठी कोसबाड कृषी विज्ञान केंद्र आणि भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रामार्फत संयुक्त मोहीम राबवली आहे. डहाणूसह तलासरी तालुक्यातील २५ चिकू बागांची निवड करून त्यांच्या अभ्यासासाठी सापळे लावले आहेत. दर पंधरा दिवसांनी सापळ्यांचे निरीक्षण नोंदविले जाते. त्याद्वारे कोणत्या भागात आणि महिन्यात कोणत्या जातीची फळमाशी वाढते. ती कोणत्या जातीची आहे. या प्रयोगाचे काम सुरू आहे. त्यामुळे भविष्यात फळमाशीवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आल्याचे कीटकशास्त्रज्ञ प्रा. उत्तम सहाणे यांनी सांगितले.

पुढील दोन वर्षे संशोधन

कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्र आणि भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र यांनी फेब्रुवारी २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत संयुक्तपणे फळमाशीच्या सव्र्हेचे काम हाती घेतले आहे. सापळ्याव्यतिरिक्त अन्य पद्धतीद्वारे कीडनियंत्रणाकरिता पुढील दोन वर्षे संशोधन केले जाणार असल्याची माहिती कीटकशास्त्रज्ञ प्रा. उत्तम सहाणे यांनी दिली.

जानेवारी व फेब्रुवारी महिन्यापासून एकरी ४ सापळे लावले तर चांगले नियत्रंण मिळते. फळमाशीवर कीटकनाशक फवारून कीडनियंत्रण करण्याएवजी फळकिडीचे जीवनचक्र समजून घेऊन सापळा लावून नियत्रंण होऊ शकते. – प्रा. उत्तम सहाणे, कीटकशास्त्रज्ञ, कोसबाड कृषी विज्ञान केंद्र