आंबोलीतील जैवविविधता तेथील काही अतिशय दुर्मीळ व नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या काही दुर्मीळ वृक्षांची लागवड प्रख्यात वनस्पतीशास्त्रज्ञ श्रीकांत इंगळहरीकर यांच्या संकल्पनेतून मंगळवारी सकाळी हिरण्यकेशी नदीपात्राच्या शेजारी करण्यात आली.
आंबोलीच्या जैवविविधतेचा अभ्यास करणारी व त्याच्या संवर्धनाचे काम करणाऱ्या मलबार नेचर कॉन्झव्‍‌र्हेशन क्लब, वनविभागाचे वनपाल अण्णा चव्हाण व त्यांचा कर्मचारीवृंद, संजय देसाई, सरपंच लीना राऊत, फुलपाखरू अभ्यासक पराग रांगणेकर, ऋतुराज पाटील, पर्यावरण यादव सर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी दहा रोपांची लागवड करण्यात आली. अशा प्रकारे आंबोलीत ज्या ज्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे त्या त्या ठिकाणी येत्या पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचा मानस क्लबच्या सदस्यांनी बोलून दाखविला.