News Flash

‘एमपीएससी’त आदिवासी विद्यार्थ्यांत पारधी प्रथम

आदिवासी विकास विभागाद्वारे विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या अर्थसहाय्य योजनेचे फळ दिसू लागले असून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत

| February 5, 2014 03:36 am

आदिवासी विकास विभागाद्वारे विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या अर्थसहाय्य योजनेचे फळ दिसू लागले असून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये चोपडा तालुक्यातील रामपुरा येथील उमाकांत पारधी राज्यात सर्वप्रथम आला आहे. हे या योजनेचे हे पहिले मोठे यश असल्याची प्रतिक्रिया यावलचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शुक्राचार्य दुधाळ यांनी व्यक्त केली.
घरची परिस्थिती जेमतेम असल्याने शिक्षण घेणे अशक्य झालेल्या उमाकांतला आदिवासी विकास प्रकल्प विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या अर्थसहाय्य योजनेतंर्गत मोलाची मदत झाली. उमाकांतने मेहनत घेतली. सोबत प्रकल्प विभागाद्वारे मिळालेल्या मदतीमुळे त्याने राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपअधीक्षकपदी धडक दिली. उमाकांतच्या यशाबद्दल त्याच्या आईवडिलांचा प्रकल्पधिकारी तथा उपायुक्त दुधाळ यांनी सत्कार केला.
उमाकांतचे दहावीपर्यंतचे शिक्षण चोपडय़ातील प्रताप महाविद्यालयात झाले. इयत्ता दहावीत तो तालुक्यात प्रथम आला. बारावीनंतर औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी त्याची वर्णी लागली. परंतु, २००६ मध्ये रत्नावती नदीला आलेल्या पुरात घर उद्ध्वस्त झाल्याने त्याला डॉक्टर होण्यापासून वंचित राहावे लागले. यावलच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या मदतीने एका संस्थेकडून प्रशिक्षण घेतल्यावर आयोगाची पोलीस उपनिरीक्षक परीक्षा दोन वेळा आणि उत्पादन शुल्क निरीक्षक परीक्षा दोन वेळा उत्तीर्ण झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2014 3:36 am

Web Title: tribal student top mpsc exam
टॅग : Mpsc Exam
Next Stories
1 नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिकांचे संमेलन
2 अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध शेगाव पोलिसांत गुन्हा दाखल
3 काँग्रेसमध्ये कलगीतुरा?
Just Now!
X