शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, सन्य, पोलीस दलातर्फे मानवंदना

‘अमर रहे, अमर रहे शहीद शुभम अमर रहे’च्या निनादात शहीद जवान शुभम सूर्यकांत मुस्तापुरे यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी दहा वाजता पालम तालुक्यातील कोनेरवाडी येथे विराट जनसमुदायाच्या साक्षीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वीरपुत्रास अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील जनसागर लोटला होता. या वेळी सन्य व पोलीस दलातर्फे बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली.

Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
buldhana, Daughter in law, Lead Social Revolution, Perform Last Rites, Father in law, Gunj village, Sindkhed Raja, marathi news, maharashtra,
बुलढाणा: चौघा सुनांनी केले सासऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, सामाजिक क्रांतीतून स्त्री पुरुष समानतेचे उदाहरण
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान

प्रारंभी शासनाच्या वतीने पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी शहीद शुभम यांच्या पाíथवावर पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. या शिवाय आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, राहुल पाटील, मोहन फड, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, जिल्हा सनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिकांनी शोकाकुल वातावरणात पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.

शहीद जवान शुभम यांचे वडील सूर्यकांत मुस्तापुरे यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी धार्मिक रीतीनुसार दफनविधी पूर्ण केला. तत्पूर्वी पोलीस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. तसेच सन्य दलाच्या औरंगाबाद स्टेशन हेड क्वार्टरच्या नऊ सनिकांच्या तुकडीनेही बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. या वेळी दोन्ही तुकडीच्या बँड पथकांनी शोकधून वाजवली. तिरंग्यामधील शहीद शुभमचे पाíथव नागरिकांना दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

जम्मू-काश्मीरमधील नियंत्रणरेषेवर झालेल्या गोळीबारात ३ एप्रिल रोजी जवान शुभम मुस्तापुरे शहीद झाले. त्यांचे पाíथव बुधवारी संध्याकाळी विमानाने औरंगाबाद येथे आणण्यात आले. काही काळ छावणी परिसरात सन्य दलाच्या वतीने अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. ५ एप्रिल रोजी पहाटे पाíथव चाटोरी या गावी आणण्यात आले. चाटोरी येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणावर पहाटेच्या वेळीसुद्धा ग्रामस्थ शुभम यांच्या पाíथवाची वाट पाहात होते. ज्या शाळेत त्यांचे शिक्षण झाले त्या ठिकाणी हे पाíथव अंत्यदर्शनासाठी काही काळ ठेवण्यात आले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात  गावकऱ्यांनी कोनेरवाडी येथे पाíथव नेले. त्यानंतर गावातील व परिसरातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून अंतिम दर्शन घेतले. शहीद शुभम यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी आसपासच्या गावांतील लोक जमा झाले होते. अंत्यसंस्कार झाले त्या ठिकाणीही श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आलेले होते.