News Flash

लिक झालेल्या अर्णव गोस्वामीच्या Whats app चॅट बद्दल भाजपने स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

TRP घोटाळ्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारचा हात असल्याचे स्पष्ट होते.

समाजमाध्यमांमध्ये BARC चे पूर्व प्रमुख पार्थो दास गुप्ता आणि रिपब्लिक चॅनलचे प्रमुख अर्णव गोस्वामी यांचे Whats app वरील चॅट व्हायरल झालेले आहेत. हे अत्यंत धक्कादायक असून त्यामधून TRP घोटाळ्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाने आणि मोदी सरकारने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की मुंबई पोलिसांनी TRP घोटाळा उघडकीस आणला असून त्यामध्ये Republic चॅनलची चौकशी चालू आहे. त्याचबरोबर BARC चे पूर्व प्रमुख पार्थो दास गुप्ता यांना अटकही करण्यात आलेली आहे. सदर TRP घोटाळा दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून झाला असून त्याकरता उत्तरप्रदेशमध्ये वेगळी केस नोंदवण्याचा प्रकार देखील घडला. हा सगळा आटापिटा आपलं कारस्थान उघड पडेल या हेतून होता, हे Whats app चॅट वरून दिसून येत आहे. सदर चॅट्स मधून रिपब्लिक चॅनेलचे प्रमुख आपला (PMO) पंतप्रधान कार्यालय, माहिती आणि जनसंपर्क मंत्रालय आणि AS यांच्याशी जवळीक असल्याचे सांगत असल्याचे दिसून येते.

त्याचबरोबर केंद्र सरकारशी संबंध असल्याने हे दोन्ही व्यक्ती रिपब्लिक चॅनलच्या TRP मध्ये वाढ होण्याची व्यूव्हरचना तयार करत होते, हे ही दिसून येते. यामध्ये AS नावाची व्यक्ती कोण आहे, हे भाजपने स्पष्ट करण्याची गरज आहे. तसेच रिपब्लिक चॅनलबद्दल माहिती जनसंपर्क मंत्रालयाला मिळालेली तक्रार बाजूला ठेवण्यात आली आहे, असे मंत्री राजवर्धन सिंग राठोड यांनी सांगितले, असे यात नमूद करण्यात आलेले आहे याचाच अर्थ रिपब्लिक चॅनलला वाचविण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करत होते हे स्पष्ट आहे.

या कालावधीमध्ये प्रेक्षकांची गोपनिय स्वरुपाची माहिती उघड करण्यात आली, हे ही दिसून येते. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. TRP घोटाळ्यामध्ये केंद्र सरकारचा काय संबंध आहे? किरीट सोमय्या व राम कदमांसहित भाजपाचे नेते Republic चॅनेलच्या प्रमुखाच्या पाठीशी का उभे राहिले? व या कारस्थानामध्ये भाजपची काय भूमिका आहे हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी पोहचतीलाच अशी अपेक्षा यावेळी सचिन सावंत यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 7:10 pm

Web Title: trp scam arnab goswami whatsapp chat leak bjp should explain sachin sawant dmp 82
Next Stories
1 “संभाजीनगर म्हणा, धाराशिव म्हणा…”, नामांतरावर शरद पवारांचं मोठं विधान
2 धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या भाजपा नेत्यांना शरद पवारांचा टोला; म्हणाले…
3 धनंजय मुंडेंसंबंधी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरुन शरद पवारांची माघार; स्पष्टीकरण देत म्हणाले…
Just Now!
X