News Flash

पुणे बँगलोर महामार्गावर ट्रकचा अपघात, तीन ठार, १० जखमी

चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला ट्रक

पुणे बँगलोर महामार्गावर ट्रकचा अपघात, तीन ठार, १० जखमी
सग्रहित छायाचित्र.

पुणे बँगलोर महामार्गावर असलेल्या खांबाटकी बोगद्याजवळच्या एस वळणावर शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बोअर मारणारा ट्रक कठड्यास जोरदार धडकून उलटला. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. तर १० जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तीन ते चारजण हे गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

वाई येथून खंडाळा येथे बोअर मारण्यासाठी ट्रक क्रमांक (एमएच- ए एल- ४४६६) हा जात असताना हा अपघात झाला . पहाटे साडेपाचच्या सुमारास बोअर मारणारा ट्रक कठड्यास एस वळणावर जोरदार धडकला . ट्रकमध्ये चालकासह १३ कामगार होते . भरधाव वेगामुळे एस वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक बाजूच्या सिमेंट कठड्याला धडकून उलटला. ट्रकमधील लोखंडी पाईप व कठड्याच्या मध्ये अडकून सर्व कामगार जखमी झाले . तीन जण गाडीखाली सापडल्याने जागीच ठार झाले . खंडाळा पोलीस , महामार्ग पोलीस यांनी क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला घेऊन मृत व जखमींना बाहेर काढले. जखमींना अधिक उपचारासाठी सातारा येथे हलवण्यात आले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2020 9:52 am

Web Title: truck accident on pune bangalore highway 3 dead on the spot scj 81
Next Stories
1 Maharashtra Budget 2020 Highlight : स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य, स्वस्त घरे; ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर
2 ‘जनाची नाही तर मनाची…’ मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
3 आम्ही हरलेलो नाही… आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतकऱ्यांच्या पत्‍नींनी दिली दहावीची परीक्षा
Just Now!
X